बंगळुरू - ऋषभ पंत लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनानंतर केवळ दहा चेंडूच खेळू शकला. पण, मुशीर खानच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाविरुद्ध चारदिवसीय दुलिप चषक स्पर्धेच्या सामन्यात भारत ‘ब’ संघाने पहिल्या दिवशी ७ बाद २०२ धावा केल्या.
१९ वर्षीय मुशीरने २२७ चेंडूंत १० चौकार व दोन षट्कारांसह नाबाद १०५ धावा करत प्रथम श्रेणीतील आपले तिसरे शतक झळकावले. नवदीप सैनीने नाबाद २९ धावा केल्या आहेत. दोघांनी आठव्या गड्यासाठी नाबाद १०८ धावांची मोलाची भागीदारी करत संघाला सावरले. एकवेळ भारत ब संघ ७ बाद ९४ असा संकटात होता. यशस्वी जैस्वाल (३०) व अभिमन्यू ईश्वरन (१३) यांनी ३३ धावांची सलामी दिली. चौदाव्या षटकात अभिमन्यू बाद झाल्यानंतर मुशीर मैदानात आला. पहिल्यांदाच दुलिप करंडकात खेळणाऱ्या मुशीरने उसळणाऱ्या चेंडूंचा संयमाने सामना केला.
ऋषभ पंत अपयशीडिसेंबर २०२२ नंतर पहिल्यांदाच लाल चेंडूवरील सामना खेळणारा ऋषभ पंत बेजबाबदार फटका मारून आकाश दीपच्या चेंडूवर शुभमन गिलकडे झेल देत बाद झाला. संक्षिप्त धावफलकभारत अ : ७९ षटकांत ७ बाद २०२ धावा (मुशीर खान नाबाद १०५) गोलंदाजी : आकाश दीप २-२८.