जोहान्सबर्ग : डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे धर्मशाळामध्ये १२ मार्चला भारताविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघातील एकमेव नवा चेहरा आहे. त्याचवेळी, माजी कर्णधार फाफ डूप्लेसिसचे संघात पुनरागमन झाले आहे. लिंडेने गेल्या वर्षी भारत दौऱ्यादरम्यान कसोटी पदार्पण केले होते.१५ सदस्यांच्या संघात डूप्लेसिस व रेसी वान डेर डुसेन यांचे पुनरागमन झाले असून त्यांना यापूर्वीच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. संघात काईल वेरीने याला कायम ठेवण्यात आले आहे. त्याने शनिवारी पार्लमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना ६४ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी करीत छाप सोडली.डूप्लेसिसच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर त्याने एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. केशव महाराज व लुथो सिपामला यांनाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)>दक्षिण आफ्रिका संघक्विंटन डिकाक (कर्णधार), तेंबा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डूप्लेसिस, काईल वेरीने, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन जॉन स्मट््स, एंडिले फेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपामला, ब्येरन हेंड्रिक्स, एनरिक नोर्टजे, जॉर्ज लिंडेव केशव महाराज.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दक्षिण आफ्रिका संघात डूप्लेसिसचे पुनरागमन, जॉर्ज लिंडे संघातील नवा चेहरा
दक्षिण आफ्रिका संघात डूप्लेसिसचे पुनरागमन, जॉर्ज लिंडे संघातील नवा चेहरा
डावखुरा फिरकीपटू जॉर्ज लिंडे धर्मशाळामध्ये १२ मार्चला भारताविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघातील एकमेव नवा चेहरा आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 4:25 AM