नागपूर: ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी नेट्समध्ये गोलंदाजी करून डुप्लिकेट अश्विन नावाने सध्या सुपरिचित झालेला बडोद्याचा फिरकीपटू महेश पिठिया जेव्हा खऱ्या आश्विनला भेटला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या आदर्श खेळाडूला भेटताच पिठिया अश्विनच्या पाया पडला, तसेच कृतकृत्य झाल्यासारखे वाटते आहे, अशी भावनाही त्याने यावेळी व्यक्त केली.
अश्विननेही त्याची आस्थेने विचारपूस केली आणि ऑस्ट्रेलियन संघाला कशी गोलंदाजी करतो आहे, याबाबत त्याच्याकडून माहितीही काढून घेतली. केवळ चार प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या पिठियाची हुबेहूब अश्विनसारखी गोलंदाजी बघून ऑस्ट्रेलियन संघाने त्याला थेट नेट गोलंदाज म्हणून करारबद्ध केले.
राहुल द्रविडची नाराजी अन् तात्काळ केला खेळपट्टीत बदल; कॅमेऱ्याची पोझिशनदेखील बदलली!
अश्विनला भेटल्यानंतर पिठिया म्हणाला, आज मला माझ्या आदर्श खेळाडूला भेटून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते आहे. अश्विनकडून मला आशीर्वाद मिळाला. त्यामुळे भविष्यातील वाटचालीत याचा मला निश्चितच फायदा होईल. नेट्समध्ये गोलंदाजीच्या वेळी मी स्मिथला पाच ते सहा वेळा बाद केले होते. इतर फलंदाजांविरुद्धही मी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचाच प्रयत्न केला. आश्विनची भेट आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. विराटनेही मला शुभेच्छा दिल्या होत्या.
डुप्लिकेट अश्विनाविरुद्ध सराव
ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा पाहुण्या फलंदाजांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतो. खबरदारी म्हणून त्यांनी अश्विनची हुबेहूब शैली असलेला महीश पिंथिया याची सेवा घेतली. महेश पिथियाला 'डुप्लिकेट अश्विन' संबोधले जाते. पिथियाच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक सराव केला.
संपूर्ण वेळापत्रक ( Full Schedule)
पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद
भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"