अ‍ॅडिलेड कसोटीदरम्यान डेव्हिड वॉर्नर शिंकताना खुर्चीवरून कोसळला, सहकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पाहा नेमकं काय झालं?

England Vs Australia Adelaide Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Ashes Series तील दुसऱ्या कसोटीदरम्यान, David Warner ला जोराची शिंक आली आणि खुर्ची लडबडून वॉर्नर काहीसा मागच्या दिशेने पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 12:59 PM2021-12-19T12:59:12+5:302021-12-19T13:00:34+5:30

whatsapp join usJoin us
During the Adelaide Test, David Warner fell from his chair while sneezing, missed his teammates' worries, see what happened? | अ‍ॅडिलेड कसोटीदरम्यान डेव्हिड वॉर्नर शिंकताना खुर्चीवरून कोसळला, सहकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पाहा नेमकं काय झालं?

अ‍ॅडिलेड कसोटीदरम्यान डेव्हिड वॉर्नर शिंकताना खुर्चीवरून कोसळला, सहकाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, पाहा नेमकं काय झालं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडिलेड - ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने वर्चस्व मिळवले आहे. पहिल्या डावात मोठा आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही चिवट खेळ करत ऑस्ट्रेलियाने ही आघाडी चारशेच्या पार पोहोचवली आहे. एकीकडे यजमान संघ सामन्यावरील पकड भक्कम करत असताना ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंचा आणि आणि पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

त्याचे झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना डेव्हिड वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये बसला होता. तेव्हा त्याला जोराची शिंक आली. ही शिंक एवढी मोठी होती की, त्या जोराने वॉर्नरचा तोल गेला आणि खुर्ची लडबडून वॉर्नर काहीसा मागच्या दिशेने पडला. तेव्हा त्याच्या बाजूला बसलेला स्टीव्ह स्मिथ आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर हेही काही काळ गोंधळले. 

डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. डेव्हिड वॉर्नरने या अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. या मालिकेतील दोन डावात तो नर्व्हस ९० मध्ये बाद झाला आहे. 

दरम्यान, अ‍ॅडलेडमधील दिवसरात्र कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७३ धावा काढून डाव घोषित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ २३६ धावांत गारद झाला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने २३७ धावांची आघाडी घेतली होती.  

Web Title: During the Adelaide Test, David Warner fell from his chair while sneezing, missed his teammates' worries, see what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.