Join us  

IND vs SL, 1st Test : श्रीलंका विजयात जडेजाची कमाल, पण इंटरनेटवर मात्र विराटच्या व्हिडिओचीच धमाल; तुम्ही पाहिला का?

खरे तर, हा सामना विराट कोहलीचीच्या ( Virat Kohli) कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना होता आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माचाही ( Rohit Sharma) पहिलाच कसोटी सामना होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 5:58 PM

Open in App

IND vs SL, 1st Test :  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) ऑलराउंडर कामगीरीने भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला. भारताने हा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 222 धावांनी जिंकला. या सामन्यात जडेजाने नाबाद 175 धावांची खेळी तर केलीच. शिवाय दोन डावात मिळून (5-41 व 4-46) 9 विकेट्स देखील घेतल्या. यानंतर, रवींद्र जडेजावर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे. पण असे असले तरी, सोशल मीडियावर मात्र, विराट कोहलीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

खरे तर, हा सामना विराट कोहलीचीच्या ( Virat Kohli) कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना होता आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माचाही ( Rohit Sharma) पहिलाच कसोटी सामना होता. या सामन्यात भारताने दिलेल्या 8 बाद 574 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला पहिल्या डावात 174 तर दुसऱ्या डावात 178 धावाच करता आल्या. याच सामन्यातील विराटचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत विराट पुष्पा चित्रपटातील 'पुष्पा'ची अॅक्टिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ᴅɪᴠʏᴀɴꜱʜ (@Lost_D18) नावाच्या युजरने ट्विट केला आहे. तसेच, व्हिडिओ बरोब त्याने, "मैं रुकेगा नी साला" असेही लिहिले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 हजार वर लोकांनी बघितला असून अनेक जर त्याला लाईक आणि रिट्विटदेखील करत आहेत.

मयांक अग्रवाल ( ३३), रोहित शर्मा ( २९), हनुमा विहारी ( ५८), विराट कोहली ( ४५), श्रेयस अय्यर ( २७) व रिषभ पंत ( ९६) यांच्या योगदानानंतर रवींद्र जडेजाची बॅट तळपली.  त्याने आणि आर अश्विनने ७व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन ६१ धावांवर माघारी परतल्यानंतर ९व्या विकेटसाठी मोहम्मद शमीसह शतकी भागीदारी केली. भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजा २२८ चेंडूंवर १७ चौकार व ३ षटकारांसह १७५ धावांवर नाबाद राहिला आणि शमीसह ( २०*) त्याने ९व्या विकेटसाठी ९४ चेंडूंत १०३ धावा जोडल्या. यानंतर, भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांकडून फारसा संघर्ष बघायला मिळाला नाही.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ
Open in App