मुंबई : मैदानात खेळत असताना दंगा केलात, तर याद राखा... असा दम सध्या क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना दिल्याचे पाहायला मिळाले आहे. मैदानात दंगा केल्यामुळे एका क्रिकेटपटूला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे वृत्त आहे.
ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ हे खेळाला कोणी बाधा पोहोचवणार नाही ना, याची दखल घेत असते. जर एखाद्या खेळाडूने खेळभावनेला धक्का पोहोचवण्याचे काम केले तर ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ त्याला कडक शिक्षा देते. यापूर्वी चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणातही त्यांनी कडक शिक्षा केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या एका खेळाडूला पंचांशी वाद घातला म्हणून दोषी ठरवले आहे. त्यासाठी त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाज जेम्स पॅटीन्सनला दोषी ठरवले आहे. गेल्या १८ आठवड्यांमध्ये त्याने तीनदा नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घातली आहे. त्यामुळे आता जेम्सला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही.