नवी दिल्ली - क्रिकेट (Cricket)हा सभ्य गृहस्थांचा खेळ असला तरी क्रिकेटच्या मैदानावर होणारे वाद हे काही नवे नाहीत. अनेकदा मैदानावर सुरू झालेली बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत गेल्याचीही उदाहरणे आहेत. आता असाच प्रकार न्यूझीलंडमधील ऑकलंड येथून समोर आला आहे. ऑकलंडमध्ये एका कम्युनिटी सामन्यादरम्यान एका क्रिकेटपटूला जोरात ठोसा मारला. चेहऱ्यावर वर्मी लागलेल्या ठोशामुळे हा क्रिकेटपटू जागेवरच कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर बऱ्याच वेळाने तो शुद्धीवर आला. (During the match, the cricketer was punched by a rival player and fainted on the spot)
न्यूझीलंडमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ऑकलंडमधील पाकुरंगा येथे खेळवण्यात येत असलेल्या एका सामन्यामध्ये अरशद बशीर न्यू लीन क्रिकेट क्लबसाठी गोलंदाजी करत होते. त्याने टाकलेला एक चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. त्यानंतर बशीरने बेईमानी न करण्यास सांगितले. बशीरचे हे बोलणे ऐकून पाकुरंगा क्रिकेट क्लबचा एक खेळाडू भडकला. त्याने वादास सुरुवात करत बशीरच्या तोंडावर ठोसा लगावला. ठोसा जोरात लागल्याने बशीर मैदानावरच बेशुद्ध पडला. त्यानंतर काही वेळाने तो शुद्धीवर आला.
दरम्यान, आरोपी खेळाडूने आपली मान पकडली आणि त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने माझ्या चेहऱ्यावर ठोसा मारला, असा आरोप बशीरने केला आहे. आता बशीरने या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली आहे. बशीर हा ऑकलंडमध्ये पार्टटाइम काम करतो. तो टॅक्सी ड्रायव्हर आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. बशीरने आरोपी क्रिकेटपटूवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या घटनेची माहिती क्रिकेट मंडळाला देण्यात आल्याचे ऑकलंडचे कम्युनिटी क्रिकेट मॅनेजर यांनी सांगितले. ऑकलंड क्रिकेट या प्रकरणी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहे.
Web Title: During the match, the cricketer was punched by a rival player and fainted on the spot
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.