csk vs lsg |लखनौ : लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यात आरसीबीच्या संघाने १८ धावांनी बाजी मारली. पण हा सामना अनेक नाट्यमय घटामोडींमुळे चर्चेत राहिला आहे. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक हे या वादात केंद्रस्थानी होते. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन हा फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. तेव्हा विराट आणि त्याच्यात काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर या वादाला वेगळे वळण लागले. नंतर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने मध्यस्थी करून नवीन आणि कोहली यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण या वादावरून लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, याचाच प्रत्यय कालच्या सामन्यात पाहायला मिळाला.
पावसामुळे सामना रद्दकाल लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनौच्या फलंदाजांना पाहुण्या चेन्नईने घाम फोडला. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या लखनौच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. पण पावसामुळे एक डावही पूर्ण झाला नाही आणि सामना रद्द करावा लागला. पण कालच्या सामन्यातील गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही चाहते गंभीरसमोर कोहली-कोहली असे नारे देत आहेत. चाहत्यांचा आवाज ऐकताच गंभीरने रागाने त्यांच्याकडे पाहिले अन् तो आपल्या मार्गाने पुढे गेला. लखनौ आणि आरसीबी यांच्या सामन्यादरम्यान गंभीर आणि कोहली यांच्यात वाद झाला होता. या वादावरून अनेक माजी खेळाडू आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण विराटच्या तर काही जण गंभीरच्या बाजून बोलत आहेत (gautam gambhir vs virat kohli ipl fight). जेव्हा विराट आणि सिराज नवीनच्या बॅटिंगवेळी त्याच्याशी बोलत होते तेव्हा अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कोहली थांबला नाही आणि सतत काहीतरी सांगत राहिला. सामना संपल्यानंतर जेव्हा कोहली आणि नवीन समोर आले तेव्हा सुरुवातीला दोघांनी हस्तांदोलन केले. पण इथेही दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला. यावरून गंभीर आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"