मुंबई : भारताने बांगलादेशविरुद्धचा तिसरा सामना जिंकला. पण या सामन्यातील एका क्षणी बांगलादेश भारतावर कुरघोडी करणार की काय, असे वाटत होते. त्याचवेळी रोहितने संघाची एक मिटींग बोलावली आणि त्यानंतर भारतीय खेळाडू पेटून उठल्याचे पाहायला मिळाले.
टीम इंडियानं तिसऱ्या सामन्यासह मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. दीपक चहरनं हॅटट्रिक घेत ट्वेंटी-20त प्रथमच पाच विकेट घेतल्या. या सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाने विशेष विमानासह नागपूर सोडल्याचे पाहायला मिळाले.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. भारताकडून श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावले. त्यामुळे भारताला बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २ बाद ११० अशी भक्कम स्थिती होती. त्यावेळी हा सामना जिंकण्याची बांगलादेशलाही संधी होती. पण त्याचवेळी रोहितने मैदाना संघाची एक बैठक घेतली आणि त्यावेळी खेळाडू पेटून उठल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत श्रेयस अय्यरने सांगितले की, " तिसऱ्या सामन्यात एक स्थिती अशी आली होती की, बांगलादेशचा संघ कुरघोडी करू पाहत होता. त्यावेळी रोहितने संघाची मैदानातच एक मिटींग बोलावली. या मिटींगमध्ये रोहितने खेळाडूंना प्रोत्साहन देणारे भाषण केले. त्यानंतर खेळाडू पेटून उठले आणि आमच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली."
Web Title: During the third match, Rohit sharma called a meeting and ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.