smriti mandhana latest news : श्रीलंकेच्या धरतीवर महिलांच्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. एकूण आठ संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. भारतीय संघाने सर्वाधिक सातवेळा आशिया चषकाचा किताब जिंकला आहे. बांगलादेशने एकदा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने पाच अंतिम सामने खेळूनही त्यांना अद्याप किताब जिंकता आला नाही. आशिया चषकाच्या स्पर्धेनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे विश्वचषकाची तयारीच आहे. शुक्रवारी भारतीय संघाने आपला सलामीचा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला. ही लढत मोठ्या फरकाने जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियाने विजयी सलामी दिली. (women's asia cup 2024)
नेहमीप्रमाणे भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर स्मृतीने तिच्या जबरा फॅनची भेट घेतली. स्मृतीची दिव्यांग चाहती आदिशा हेराथचे अखेर आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. क्रिकेटवरील प्रेम आदिशाला सर्व आव्हानांना न जुमानता स्टेडियममध्ये घेऊन आले. मग तिची स्मृतीशी भेट झाली. आपल्या या चाहतीच्या प्रेमाला दाद देताना स्मृती मानधनाने तिला मोबाईल म्हणून दिला.
दरम्यान, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. तिने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ४५ धावा करून आपल्या संघाच्या विजयात योगदान दिले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या होत्या. या सोप्या आव्हानापर्यंत पोहोचताना भारताकडून स्मृती आणि शेफाली वर्मा या जोडीने कमाल केली. अखेर टीम इंडियाने १४.१ षटकांत ३ बाद १०९ धावा करून विजयी सलामी दिली.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलथा, आशा शोभना , राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.
राखीव खेळाडू - श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कान्वेर, मेघना सिंग.
आशिया चषकातील भारताचे पुढील सामने -
२१ जुलै - भारत विरूद्ध यूएई
२३ जुलै - भारत विरूद्ध नेपाळ
Web Title: During Women's Asia Cup 2024, Team India's player Smriti Mandhana gifted a mobile phone to her disabled fan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.