ठळक मुद्देभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या संघात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफचे पुनरागमन झाले आहे.
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून सलामीवीर ड्वेन स्मिथला डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे, तर दुसरा सामना 12 ते 16 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हैदराबाद येथे होणार आहे.
भारतीय दौऱ्यात वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकांमध्ये स्मिथला संधी देण्यात आली होती.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या संघात 21 वर्षीय वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर किमो पॉल, सुनील अम्बरीस आणि जाहमर हॅमिल्टन यांना संधी देण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्त्व जेसन होल्डरकडेच सोपवण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अम्बरीस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रॉस्टन चेस, शेन डॉवरीच, शॅनॉन गॅब्रियल, जाहमर हॅमिल्टन, शिर्मान हेटमायर, शाइ होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच आणि जोमेल वॅरिकन.
Web Title: Dwayne Smith dropped for India Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.