जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. भारतातील कोरोना रुग्णाचा आकडा 13,495 झाला असून आतापर्यंत 448 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खेळाडूंना मैदानावर परतण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा पाहावी लागणार.
'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र
भारताविरुद्ध मालिका होत नसल्यानं पाकिस्तानला 690 कोटींचा फटका!
या लॉकडाऊनच्या काळात सर्व क्रिकेटपटू आपापल्या कुटुंबीयांना वेळ देत आहेत. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या आदी आपल्या कुटुंबीयांना वेळ देण्याबरोबर घरच्या कामातही हातभार लावत आहेत. पण, सध्या विराट-अनुष्का यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट आणि पत्नी अनुष्का लोकांना घरी राहण्याचं आवाहन करत आहे.
या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात अनुष्का विराटकडे एक भलतीच डिमांड करत आहे. ती म्हणतेय,''ए कोहली, ऐ कोहली, चल चौका मार.''
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माचा दिनक्रम कसा असतो. रोहितनं खास व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रोहित घरच्यांसोबत खेळणे, एक वर्षाच्या समायरासोबत दंगा घालणे, व्यायाम करणे, जेवण बनवणे, कपडे धुणे अशी सर्व काम करत आहे.
''देशातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, ब्रॉडकास्टर, स्पॉन्सर्स आणि सर्व भागदारक यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेला आहे. देशातील परिस्थितीवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहोत,'' असेही शाह यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
IPL 2020 होणार?; BCCI समोर 'या' देशानं ठेवला स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव!