लंडन : एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व १० संघांसोबत प्रत्येकी एक भ्रष्टाचार विरोधी पथक अधिकारी राहणार आहे. स्पर्धेला स्पॉट फिक्सिंग अथवा सट्टेबाजीचे गालबोट लागू नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आल्याची माहिती आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली.
एका वृत्तानुसार, ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या विश्वचषकाच्या सराव सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्वच संघांसोबत प्रत्येकी एक भ्रष्टाचार विरोधी पथक अधिकारी कार्यरत राहणार आहे. याआधी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिकारी सामनास्थळी उपस्थित राहायचे. यामुळे स्पर्धेदम्यान संघांना आणि खेळाडूंना प्रत्येक अधिकाºयाच्या संपर्कात राहावे लागायचे. आता संघासोबत नेमण्यात येणारा एक अधिकारी त्या संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्येच थांबेल.
त्यांच्या सराव लढतींपासून मुख्य स्पर्धेतील सामन्यांपर्यंत प्रत्येक हालचालींवर नजर ठेवेल. स्टेडियममध्ये होणाºया हालचाली टिपण्याचे काम हा अधिकारी करणार आहे. विश्वचषकाला फिक्सिंगमुक्त करण्यासाठी आयसीसीने उचललेल्या उपायांचा हा भाग आहे.’ (वृत्तसंस्था)
सरावापासून ते अंतिम सामन्यापर्यंत...
याआधी भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिकारी स्पर्धेच्या प्रत्येक स्थळावर उपस्थित रहायचे. यामुळे प्रत्येक संघाला स्पर्धेदरम्यान अनेक अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे लागत असे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मात्र सराव सामन्यापासून प्रत्येक संघाच्या अखेरच्या सामन्यापर्यंत भ्रष्टाचार विरोधी पथकाचा एक अधिकारी कायम संघासोबत राहील.
विश्वचषक स्पर्धा अखेरपर्यंत पारदर्शीपणे पार पडावी या उद्देशाने आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर खेळाडूंचे भ्रष्टाचार विरोधी पथकासह चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेही हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Web Title: Each team will have anti corruption officials; Spot-fixing, ICC step to avoid betting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.