R Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी 

गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:59 PM2021-05-17T16:59:01+5:302021-05-17T16:59:23+5:30

whatsapp join usJoin us
Earlier yesterday, I had wrongly posted a pic about 'crowd outside a ration shop'. Sorry about that, Say R Ashwin | R Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी 

R Ashwin : कोरोना संकटात आर अश्विनकडून झाली चूक; सोशल मीडियावरून मागितली जाहीर माफी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गेल्या चोवीस तासांत देशात २,८१,३८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ३,७८,७४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आऱ अश्विन ( R Ashwin) च्या घरातील १० सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीगमधून ( IPL 2021) त्यानं माघार घेत घरच्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आर अश्विन त्यानंतर सोशल मीडियावरून सातत्यानं कोरोना संदर्भात जनजागृती करत आहे. पण, रविवारी त्यानं एक चूकीचं ट्विट केलं. त्यानं ट्विटमध्ये लोकांची गर्दी जमलेला फोटो पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती आणि सर्वांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करा असं आवाहनही केलं होतं. पण, त्यानं सोमवारी एक ट्विट करून आपली चूक मान्य केली.

त्यानं ट्विट केलं की,''काल मी एक फोटो पोस्ट केला. त्यात रेशन दुकानाबाहेर गर्दी जमल्याचे मी सांगितले होते. पण, मी माफी मागतो. ती गर्दी औषधांसाठी झाली होती. प्रत्येकाला आपल्या प्रियजनाची काळजी होती आणि त्यापोटी त्यांची ती धडपड होती. तरीही कृपया करून अशी गर्दी करणं टाळा. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ क्रिकेटपटूंनाही बसली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, मायकेल हस्सी, लक्ष्मीपती बालाजी यांना कोरोनाची लागण झाली. आर अश्विनच्या कुटुंबीयांतील १० सदस्यांना कोरोना झाला, युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांनाही कोरोना झाला आहे. भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिनं कोरोनामुळे आई व बहिणीला गमावले. भारताची माजी क्रिकेटपटू सरावंत नायडू (Sravanthi Naidu) हिचे आई-वडील कोरोनाचा उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 
 

Web Title: Earlier yesterday, I had wrongly posted a pic about 'crowd outside a ration shop'. Sorry about that, Say R Ashwin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.