आयपीएलचा हंगाम आता समारोपाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. नव्या प्रतिभावान खेळाडूंना शोधून काढणे हा आयपीएलचा मूळ गाभा असला, तरी भारतीय क्रिकेटला सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी नेमकी कशी चालते, या स्पर्धेचे बिझनेस मॉडेल काय, असे अनेक प्रश्न चाहत्यांना वेळोवेळी पडत असतात.
या स्पर्धेवर आतापर्यंत अरबो रुपयांची उधळण होत आलेली आहे. त्यामुळेच आयपीएलच्या सेवेसाठी अनेक कंपन्या सदैव तत्पर असतात. क्रिकेट जगतातल्या या अव्वल नंबरी ब्रँडचे बिझनेस मॉडेल जाणून घेणे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलेले आहे. कोणाला किती पैसे मिळतात, स्पर्धेवर किती खर्च होतात, बीसीसीआय यातून किती कमवते इत्यादी प्रश्न. या अनुषंगाने क्रिकेट चाहत्यांना पडलेले असे काही प्रश्न आणि या स्पर्धेच्या बिझनेस मॉडेलविषयी त्यांचे कुतूहल शमविण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...