पृथ्वीच्या आकारावरून वर्षानुवर्षे अनेक वाद झाले. काही लोकांनी पृथ्वी सपाट असल्याची, तर काहींनी गोलाकार असल्याचा दावा केला. विकसित तंत्रज्ञानानंतर पृथ्वीचा खरा आकार आज लोकांना समजला आहे. पण, इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँण्ड्य्रू फ्लिंटॉफनं एक अजब दावा केला आहे. त्यानं पृथ्वी गोल नसून सलगम नावाच्या कंदासारखी आहे, असा दावा केला आहे.
talkSPORTशी बोलताना फ्लिंटॉफ म्हणाला की,''पृथ्वी ही सलगम नावाच्या कंदासारखी सपाट आहे. पृथ्वी पॅनकेकसारखी सपाट नाही. ती किंचितशी गोलाकार आहे, परंतु पूर्ण गोल नाही.''