मुंबई - भारताला 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉ याच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर नसल्याचे समोर आले होते. दरम्यान, आज पृथ्वीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पृथ्वी शॉचे कौतुक करताना तू फक्त खेळावर लक्ष दे, घराच्या चिंतेचा त्रास तुला होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने नुकत्याच आटोपलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहत विश्वचषकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत कर्णधार पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय युवा संघाचे सोमवारी मायदेशात आगमन झाले. तेव्हापासून विविध स्तरांमधून पृथ्वीचे कौतुक सुरू आहे. दरम्यान, आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पृथ्वीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले, "पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही. पृथ्वीने फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, त्याला घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही."
Web Title: Earth, you pay attention to cricket only and will not let the anxiety of the house be disturbed - Uddhav Thackeray
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.