आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अलीकडेच बीसीसीआयसोबत सर्व फ्रँचायझींच्या मालकांची बैठक झाली. आयपीएल २०२४ चा हंगाम नाना कारणांची चर्चेत राहिला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने किताब उंचावला. त्यांच्या या विजयात अष्टपैलू सुनील नरेनचे मोठे योगदान होते. आता लोकप्रिय भारतीय रिॲलिटी टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मध्ये याबद्दलच एक प्रश्न विचारण्यात आला. अमिताभ बच्चन यांचा हा शो भारतीयांचे मनोरंजन करत असतो. याशिवाय अनेकांनी कोट्यवधी रूपये कमावण्याची संधी देखील देतो.
सोमवारी केबीसीच्या १६व्या पर्वाच्या उद्घाटनाच्या भागातमध्ये आयपीएलशी संबंधित प्रश्नांचा समावेश होते. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी सहभागी उत्कर्ष बक्षी यांना ८०,००० रुपयांसाठी क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारला. '२०२४ च्या आयपीएल हंगामातील सर्वात मौल्यवान अष्टपैलू खेळाडू कोण?' या प्रश्नासाठी स्पर्धकासमोर नेहमीप्रमाणे चार पर्याय होते. पॅट कमिन्स, विराट कोहली, सुनील नरेन आणि ट्रॅव्हिस हेड हे चार पर्याय होते.
आयपीएलमधील या सोप्या प्रश्नाचे उत्तर स्पर्धकाला माहिती नव्हते. मग अमिताभ बच्चन यांनी ऑडियन्स पोल घेण्याची मागणी केली. प्रेक्षकांनी तिसऱ्या पर्यायाला पसंती दर्शवली. या प्रश्नाचे उत्तर सुनील नरेन असे आहे. नरेनने २०२४ च्या आयपीएल हंगामात केकेआरसाठी महत्त्वाचे योगदान दिले.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. याआधी त्यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनवेळा आयपीएल जिंकली होती. आयपीएल २०२४ मध्ये सुनील नरेनने सलामीवीर म्हणून स्फोटक खेळी केली. संघाचा मार्गदर्शक गंभीरच्या रणनीतीनुसार नरेनने सलामीला येत रूद्रावतार दाखवला.