- हर्षा भोगले लिहितात...कोलकाता येथील मावळत्या उन्हात दोन उच्च दर्जाच्या संघाचे कर्णधार एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांपुढे येणार आहेत. सोबतच दोघांचीही नजर ईडनच्या खेळपट्टीकडे जाईल. ही खेळपट्टी आता संथ आणि फिरकीला अनुकूल राहिलेली नसून उसळी घेणारी मानली जाते. सनराईजर्स हैदराबादसाठी ही गोष्ट अडचणीची नसली, तरी स्थानिक कोलकाता नाईटरायडर्सला जुन्या खेळपट्टीची अधिक सवय झालेली असेल.मुंबई इंडियन्सप्रमाणे नाईटरायडर्सकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. फर्ग्युसन आणि रसेल यांच्यात ताळमेळ असून फिरकीची बाजी नरेन, चावला आणि कुलदीप हाताळणार आहेत. दुसरीकडे सनराईजर्सच्या वेगवान माऱ्यातही दम आहे. फिरकीत मात्र शाकिब, नबी आणि राशिद यांच्यापैकी दोघांना संधी मिळेल. सनराईजर्ससाठी नेहमी गेमचेंजर ठरलेल्या वॉर्नरचे स्वागत करण्यास ईडनची वेगवान खेळपट्टी उत्सुक आहे. लिन याने देखील केकेआरच्या चाहत्यांना क्षमतेची केवळ एक झलक दाखविली. दोन्ही संघाची फलंदाजीही तुल्यबळ आहे. हैदराबादची आघाडीची फळी भक्कम असून केकेआरची तळाची फळी मजबूत आहे.मुंबईच्या रम्य सायंकाळी तीनवेळचा चॅम्पियन स्थानिक संघ मुंबई इंडियन्स विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल. मुंबईची फलंदाजी चांगली आहे पण तीन विदेशी गोलंदाजांची उणीव त्यांना जाणवेल. दोन्ही संघांकडे दिग्गज असले तरी मुंबईकडे स्फोटक फलंदाज, तर दिल्लीकडे वेगवान भेदक गोलंदाज आहेत. बोल्ट, रबाडा आणि ईशांत व अवेश यांच्याविरुद्ध रोहित आणि क्वींटन डिकॉक यांची फलंदाजी पाहणे रंजक ठरेल.- नवे खेळाडू दडपण हाताळण्यात यशस्वी होतील, असे वाटते. मुंबई संघ वानखेडेवरील स्वत:चे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यास सज्ज असेल. ही एक दीर्घ आणि कठीण स्पर्धा आहे. आघाडी घेणारे संघ माघारू शकतात. निर्णायक सामन्यात कुठलाही संघ आघाडी घेऊ शकतो. तथापि चांगली सुरुवात करणाऱ्या संघांना चांगले निकाल मिळतील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ईडनची खेळपट्टी वॉर्नरच्या स्वागतासाठी सज्ज
ईडनची खेळपट्टी वॉर्नरच्या स्वागतासाठी सज्ज
कोलकाता येथील मावळत्या उन्हात दोन उच्च दर्जाच्या संघाचे कर्णधार एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांपुढे येणार आहेत. सोबतच दोघांचीही नजर ईडनच्या खेळपट्टीकडे जाईल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:25 AM