१५-१५ सेकंदाचे आठ वर्क आऊट अन्...! IPL 2024 साठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी

हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधून पुनरागमनासाठी सज्ज होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:54 PM2024-01-31T13:54:06+5:302024-01-31T13:54:28+5:30

whatsapp join usJoin us
Eight work outs of 15-15 seconds and...! Mumbai Indians captain Hardik Pandya prepares hard for IPL 2024, Watch Video  | १५-१५ सेकंदाचे आठ वर्क आऊट अन्...! IPL 2024 साठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी

१५-१५ सेकंदाचे आठ वर्क आऊट अन्...! IPL 2024 साठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेला हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधून पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुबंई इंडियन्सच्या ताफ्यात परतलेल्या हार्दिकला आयपीएलमधील यशस्वी फ्रँचायझीचे नेतृत्व सांभाळायचे आहे. त्यासाठी तो कसून मेहनत घेत आहे आणि त्याने वर्क आऊटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


हार्दिक घोट्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे. या दुखापतीमुळे त्याला २०२३च्या वन डे वर्ल्ड कपनंतर काही मालिकांना मुकावे लागले आहे. तो घऱच्या मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील भारतीय संघाचाही तो सदस्य नव्हता. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध घरी झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीही तो फिट झाला नाही. कसोटी संघाचा सदस्य नसल्याने तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही नाही. अशात त्याचे पुनरागमन हे आयपीएल २०२४ मधूनच होणार आहे. 


घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला पांड्या २०२४ च्या मोसमासाठी गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये खेळणार आहे. MI ने पांड्यासाठी १५ कोटी रुपये मोजले.  त्याला मुंबईत रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. ३० वर्षीय खेळाडूने आयपीएलमध्ये १२३ सामने खेळले आहेत. त्याने ५३ विकेट्ससह २३०० हून अधिक धावा केल्या आहेत.  

Web Title: Eight work outs of 15-15 seconds and...! Mumbai Indians captain Hardik Pandya prepares hard for IPL 2024, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.