Ajaz patel: एका डावात १० बळी घेणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंडने दाखवला संघातून बाहेरचा रस्ता, कारण वाचून बसेल धक्का

Ajaz patel News: भारताविरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व १० बळी घेऊन न्यूझीलंडच्या एजाज पटेलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता या एजाज पटेललाच New Zealand ने धक्का दिला असून, त्याला थेट कसोटी संघातून बाहेरची वाट दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:06 AM2021-12-23T10:06:37+5:302021-12-23T10:23:01+5:30

whatsapp join usJoin us
Ejaz Patel, who took 10 wickets in an innings, was shown the way out of the team by New Zealand | Ajaz patel: एका डावात १० बळी घेणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंडने दाखवला संघातून बाहेरचा रस्ता, कारण वाचून बसेल धक्का

Ajaz patel: एका डावात १० बळी घेणाऱ्या एजाज पटेलला न्यूझीलंडने दाखवला संघातून बाहेरचा रस्ता, कारण वाचून बसेल धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यामध्ये एका डावात सर्वच्या सर्व १० बळी घेऊन न्यूझीलंडच्या एजाज पटेलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र आता या एजाज पटेललाच न्यूझीलंडने धक्का दिला असून, त्याला थेट कसोटी संघातून बाहेरची वाट दाखवली आहे. न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घो,णा केली आहे. या संघामध्ये एका डावात १० बळी घेऊन इतिहास रचणाऱ्या एजाज पटेलला स्थान देण्यात आले नाही. दरम्यान एजाज पटेलला संघाबाहेर ठेवण्यासाठी निवड समितीने दिलेले कारण वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

न्यूझीलंडमधील परिस्थिती विचारात घेऊन एजाज पटेलला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण न्यूझीलंडच्या निवड समितीने दिले आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या कसोटी मालिकेमध्ये न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन हाही या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत सलामीवीर टॉम लॅथम न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. याआधी भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटीतही त्याने किवी संघाचं नेतृत्व केलं होतं.

न्यूझीलंडमधील वातावरण आणि तेथील खेळपट्ट्या विचारात घेऊव किवी संघाने आपल्या वेगवान गोलंदाजीला मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, काइल जेमिन्सन यांच्यासोबतच मॅट हेन्रीला १३ सदस्यीस संघात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याबरोबरच डेवेन कॉन्वे याचेही संघामध्ये याचेही संघात पुनरागमन झाले आहे.

दरम्यान, एजाज पटेल ऐवजी कानपूर कसोटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या रचिन रवींद्रला फिरकीपटू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय डेरेल मिचेलनेही कसोटी संघातील स्थान कायम राखले आहे.

न्यूझीलंडचा संघ 
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवेन कॉन्वे, मॅट हेन्री, काइल जेमिन्सन, डेरेल मिचेल, हेन्री निकोल्स, रचिन रविंद्र, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, विल यंग.  

Web Title: Ejaz Patel, who took 10 wickets in an innings, was shown the way out of the team by New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.