Join us  

AFG vs NZ : कसोटी सामना सुरु करण्यासाठी इलेक्ट्रिक पंख्याचा वापर; पण...

अफगाणिस्तान संघाने व्यक्त केली नाराजी, न्यूझीलंडच्या संघाने मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 2:39 PM

Open in App

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना सुरु करण्यासाठी  ग्राउंड स्टाफ चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. मैदानातील ओलसरपणा कमी करण्यासाठी इथं चक्क  इलेक्ट्रिक पंखे वापरण्यात आले आहेत. एवढेच नाही तर कसोटीचे सर्वच दिवस वाया जावू नयेत, यासाठी प्रॅक्टिस साठी उपलब्ध असलेल्या जागेतील गवताचे पॅचेस काढून ते मुख्य मैदानाच्या आउटफिल्डवर लावण्याच कामही ग्राउंड्समनकडून सुरु आहे. 

निरीक्षण होणार, पण सामना खेळवणं 'मुश्किल'च

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना खेळवणं शक्य आहे की नाही, त्यासंदर्भात मैदानातील पंच दुपारी ३ वाजता पाहणी करणार आहेत. सामन्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल. पण आउटफिल्डवरील ओलसरपणा पाहता सामना खेळवणं अधिक कठीण झाल्याचे दिसून येते.  

न्यूझीलंडचे खेळाडू हॉटेलवरच!

मंगळवारचा दिवस हा सूर्य प्रकाशाच्या किरणांनी बहरेलेला असला तरी मागील काही दिवसांत पावसामुळे जे नुकसान झालंय ते भरून काढण्यासाठी वेळ लागतोय. परिणामी सामना काही सुरु होऊ शकलेला नाही. न्यूझीलंडच्या संघातील खेळाडूंनी सुरुवातीच्या  सामन्याला होणारा विलंब लक्षात घेता रग्बी बॉल खेळाचा आनंद घेतला. पण मंगळवारी मात्र संघाने हॉटेलवर राहण्यालाच पसंती दिली. 

अफगाणिस्तान बोर्डाच्या पदरी निराशा

अफगाणिस्तानचा संघ २०१७ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मदतीने या मैदानात अनेक टी २० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मेजवानी करत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील व्यत्ययामुळं अफगानिस्तान क्रिकेट बोर्डानं निराशा व्यक्त केली आहे. पण बीसीसीआयसोबतचे सलोख्याचे संबंध कायम राहतील, ही गोष्टही ते दुर्लक्षित करणार नाहीत.  

ग्रेटर नोएडातील  स्टेडियवर अफगाणिस्तानी खेळाडूंची गैरसोय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यानं ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथित स्टेडियमवर सुविधांचा अभाव आहे.  त्यामुळे यापुढे आम्ही इथं खेळणार नाही. लखनऊला आमची पहिली पसंती असेल, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

टॅग्स :अफगाणिस्तानन्यूझीलंड