-सुनील गावसकर
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने त्याच्या संघाला प्रेरित करत वाँडरर्सवर विजय मिळविला. तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी मिळविली. अनेक लोकांप्रमाणे माझेही हे मत होते की, या कमकुवत आणि अननुभवी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी चौथ्या डावात भारतीय संघाने दिलेले लक्ष्य साध्य करणे शक्य होणार नाही. रोलरचे वजन कितीही असले तरी खेळपट्टीवर साडेसात मिनिटे पुढे-मागे केले जाते आणि सामान्यपणे या दृष्टिकोनात फारसे अंतर बघायला मिळत नाही. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना दोनवेळा रोलरने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फायदा मिळवून दिला. पूर्ण सामन्यात बघितले गेले की, रोलरच्या वापराने अर्धा तास खेळपट्टी नरम राहिली होती. काही निश्चित जागांवर सलग बॉल टाकल्यावर उसळीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या.
हीच ती वेळ होती जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधाराने समर्पण आणि कटिबद्धतेने अन्य खेळाडूंना मार्ग दाखवला. फक्त तीन गडी गमावून लक्ष्य मिळविणे हे दाखवत नाही की भारतीय गोलंदाजांनी कशी गोलंदाजी केली. तर हे दाखवते की, कर्णधार त्याच्या जागी ठाम उभा राहिला आणि अन्य फलंदाजांनी त्याच दृष्टिकोनातून फलंदाजी केली. नक्कीच एल्गरच्या शरीरावर काळे-निळे निशाण पडले असतील. व्रणांचा त्याला नक्कीच अभिमान असेल. कारण हे त्याने त्याच्या संघासाठी मिळवले आहे.
ढगाळ वातावरणात गोलंदाज दबदबा बनवतील, अशी अपेक्षा होती. मात्र याच प्रयत्नात काही षटकांमध्ये धावादेखील काढल्या गेल्या. हीच षटके ऑक्सिजनप्रमाणे राहिली. त्यामुळे फलंदाज नव्याने स्वत:चा संघ आणि देशासाठी गोलंदाजांच्या समोर उभा राहिला. स्वाभाविक आहे की, पराभवासाठी कुणाला तरी जबाबदार ठरविले जाईल. मात्र सत्य हे आहे की, जोहान्सबर्गची खेळपट्टी अशी होती, जिथे गोलंदाजांसाठी नेहमीच संधी होती. अशा स्थितीत फलंदाजांना नशिबाचा आधार घ्यावा लागला. भारतीय खेळाडूंनी सामन्यात आपले सर्वकाही दिले. मात्र हा दिवस त्यांचा नव्हता. गोष्ट फक्त एवढीच आहे. (टीसीएम)
Web Title: Elgar led the team to victory; He will surely be proud of his wounds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.