पॉचस्ट्रॉम (दक्षिण आफ्रिका) : सलामीवीर डीन एल्गर अवघ्या एका धावेमुळे द्विशतकापासून वंचित राहिला; परंतु त्याच्या आणि हाशिम अमला (१३७) याच्या शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसºया दिवशी चहापानापर्यंत ३ बाद ४९६ या धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला.
दुस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेने १ बाद २९८ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला आणि काल नाबाद असलेले दोन्ही नाबाद फलंदाज एल्गर आणि अमला यांनी उपाहारापर्यंतच संघाला ४११ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
बांगलादेशला दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्रातही यश मिळाले नाही. एल्गर व अमला यांनी चौथ्या गड्यासाठी २१५ धावांची भागीदारी केली. ही जोडी शफीउल इस्लाम याने अमला याला बाद करीत फोडली. कसोटीत २७ वे शतक ठोकणाºया अमला याने १३७ धावांच्या खेळीत १७ चौकार व एक षटकार मारला.
डावाच्या १३१ व्या षटकात मुस्तफिजूर रहमान याने सुरेख फलंदाजी करणाºया एल्गर याला बाद करीत त्याला कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक ठोकण्यापासून वंचित ठेवले. आंतरराष्ट्रीय कसोटीत १९९ धावांवर बाद होणारा एल्गर १२ वा खेळाडू आहे. ३८८ चेंडूंच्या मॅरेथॉन खेळीत त्याने १५ चौकार व ३ षटकार मारले. त्यानंतर तेंबा बावुमा व कर्णधार फाफ डुप्लेसिस यांनी चहापानापर्यंत संघाची धावसंख्या ४९६ वर पोहोचवली आणि दक्षिण आफ्रिकेने डाव घोषित केला. बावुमा ३१ आणि डू प्लेसिस २६ धावांवर नाबाद राहिले. त्याआधी काल सलामीवीर फलंदाज एडन मारक्रम पदार्पणातच शतक ठोकण्यापासून वंचित राहिला. तो ९७ धावांवर धावबाद झाला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १४६ षटकांत ३ बाद ४९६. (डीन एल्गर १९९, हाशिम अमला १३७, एडन मारक्रम ९७, बावुमा नाबाद ३१, फाफ डुप्लेसिस नाबाद २६. शफीउल इस्लाम १/७४, मुस्तफिजूर रहमान १/९८).
Web Title: Elgar's 200th Century; South Africa declared their innings at 496 for 3 against Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.