Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात आज एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) असा सामना रंगत आहे. SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. RCBचे चार फलंदाज ६२ धावांतच तंबूत परतल्यानं कर्णधार विराट कोहलीचा चेहरा पडला. एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) याचे अर्धशतक ही एकमेव गोष्ट विराटसाठी दिलासादायक ठरली. एबीच्या अर्धशतकाच्या जोरावर RCBनं कसाबसा समाधानकारक पल्ला गाठला. पण, याच एबीला बाद करून टी नटराजननं स्वप्नवत विकेट घेतली.
आरोन फिंच संघात असतानाही विराट कोहलीनं RCBसाठी देवदत्त पडीक्कलसह सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याला बाद करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरनं पहिले षटक संदीप शर्माच्या हाती सोपवलं. जेसन होल्डरनं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराटला ( ६) बाद केले. त्यानं पडीक्कलला ( १) प्रियान गर्गकरवी झेलबाद केलं. १५ धावांत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि फिंच यांनी सावध पवित्राच घेतला. शाहबाद नदीमनं फिंचला ११व्या षटकात ३२ धावांवर झेलबाद केले. मोईन अलीच्या वाट्याला फ्री हिटचा चेंडू आला अन् त्याच चेंडूवर तो बाद झाला.
एबी डिव्हिलियर्सला दुसऱ्या बाजूनं योग्य साथ न मिळाल्यानं RCBला २० षटकांत ७ बाद १३१ धावाच करता आल्या. एबीनं ४३ चेंडूंत ५६ धावा केल्या. टी नटराजननं टाकलेल्या १८व्या षटकात उत्कृष्ट यॉर्कर टाकून एबी डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवला. होल्डरनं २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. टी नटराजननं दोन विकेट्स घेतल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६५ यॉर्कर त्यानं फेकले.
पाहा विकेट...
Web Title: Eliminator, SRH vs RCB : T Natrajan cleans up AB Devilliers with a yorker - What a ripper, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.