अहमदाबाद क्राइम ब्रँचने नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांना एक मेल आला होता, ज्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे तेच स्टेडियम आहे, जिथे क्रिकेट विश्वचषकाचे बहुतेक सामने आयोजित केले गेले आहेत. १४ ऑक्टोबर रोजी येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामनाही होणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्याला गुजरातमधील राजकोट येथून अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक तपशील न देता ते म्हणाले की, आरोपीने स्टेडियममध्ये स्फोट होणार असल्याचा दावा करणारा ईमेल पाठवला होता. आरोपी मूळचा मध्य प्रदेशचा आहे. सध्या राजकोटच्या हद्दीत राहत होते. त्या व्यक्तीने त्याच्या फोनवरून मेल पाठवला होता. मात्र, या मेलमध्ये त्यांचे नाव नव्हते. तसेच १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
आज भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना-
वनडे विश्वचषकाच्या सलामी लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा सामना करीत विजय मिळविणारा भारतीय संघ आज दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर एकतर्फी वर्चस्व गाजविण्यास उत्सुक आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा याने वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार खेळण्याचे आमच्यापुढे आव्हान असेल, असेही म्हटले आहे. अफगाणिस्तानचा मारा ऑस्ट्रेलियासारखा मुळीच नाही. कोटला मैदान आकाराने लहान असल्याने षट्कारांची आतषबाजी अपेक्षित आहे. विश्वचषकाआधी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे स्वरूप वेगळे आहे. विराट घरच्या मैदानावर खेळणार असल्याने चेन्नईतील खेळीची पुनरावृत्ती करण्याची त्याच्याकडून अपेक्षा बाळगण्यात येत आहे.