Join us  

बांगलादेशचा स्फोटक मारा! पण भारतीय कर्णधाराला 'यश', आशिया कपच्या फायनलसाठी 'काटे की टक्कर'

EMerging asia cup 2023 : इमर्जिंग आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत अ आणि बांगलादेश अ या संघांमध्ये लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 5:48 PM

Open in App

INDA vs BANA : इमर्जिंग आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत अ आणि बांगलादेश अ या संघांमध्ये लढत होत आहे. या सामन्यातील विजयी संघ पहिल्या उपांत्य फेरीतील विजयी संघ अर्थात पाकिस्तानसोबत रविवारी फायनलचा सामना खेळेल. पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरी १ मध्ये श्रीलंकेचा पराभव करून फायनलमध्ये जागा मिळवली. विजयाची हॅटट्रिक लगावून इथपर्यंत पोहचलेल्या भारतीय संघाला फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. कारण नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला साजेशी खेळी करता आली नाही. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. कर्णधार यश धुल वगळता (६६) कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावणाऱ्या साई सुदर्शनला देखील काही खास कामगिरी करता आली नाही. तो २१ धावा करून तंबूत परतला. तर अभिषेक शर्मा (३४), निकिन जोस (१७), यश धुल (६६), निशांत सिंधू (५), रियान पराग (१२), ध्रुव झरेल (१), हर्षित राणा (९), मानव सुथार (२१), राजवर्धन हंगर्गेकरला (१५) धावा करण्यात यश आले. बांगलादेशच्या आक्रमक गोलंदाजीसमोर भारतीय संघ निर्धारित ५० षटके देखील खेळू शकला नाही अन् ५ चेंडू राहिले असताना सर्वबाद झाला. 

बांगलादेशसमोर २१२ धावांचे आव्हानबांगलादेशच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत बलाढ्य भारताला २११ धावांपर्यंत रोखले. त्यामुळे आता फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी बांगलादेशला २१२ धावांची आवश्यकता आहे. तर २११ धावांचा बचाव करण्याचे आव्हान भारतासमोर आहे. बांगलादेशकडून मेहदी हसन (२), तनझीम साकिब (२), रकिबुल हसन (२), रिपोन मोंडोल (१) आणि सैफ्य हसन (१), सौम्य सरकारला (१) बळी घेण्यात यश आले.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशएशिया कप 2022भारतीय क्रिकेट संघ
Open in App