India A squad for ACC Men’s T20 Emerging Teams Asia Cup 2024 announced : इमर्जिंग आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, टीम इंडिया तिलक वर्माच्या नेतृत्वात असेल. तर स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवत असलेला अभिषेक शर्मा उपकर्णधार म्हणून मैदानात असेल. १८ ते २७ ऑक्टोबरदरम्यान ओमान येथे ही स्पर्धा खेळवली जाईल. दोन गटात संघाची विभागणी करण्यात आली आहे. भारत अ संघ ब गटात ओमान, पाकिस्तान अ आणि यूएई या संघांसह आहे, तर दुसऱ्या अ गटात अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, हाँगकाँग आणि श्रीलंका अ हे संघ आहेत. भारत अ आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तान अ विरुद्ध १९ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळेल. ही लढत ओमान क्रिकेट अकादमी येथे होईल. विशेष बाब म्हणजे इमर्जिंग आशिया चषकासाठी टीम इंडियात ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल असे अपेक्षित होते. किंबहुना त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. मात्र, ऋतुराजला पुन्हा एकदा डच्चू मिळाला.
भारताचा संघ -तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, निशांत सिंधू, रमनदीप सिंग, नेहाल वढेरा, आयुष बदोनी, अनुज रावत, साई किशोर, हृतिक शौकीन, राहुल चाहर, वैभव अरोरा, अंशुल कंबोज, Aquib Khan, रासिक सलाम.
अ गटातील संघ - भारत अ, ओमान, पाकिस्तान, यूएई. ब गटातील संघ - अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, हाँगकाँग, श्रीलंका अ.
भारताचे सामने -१९ ऑक्टोबर २०२४ - भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ२१ ऑक्टोबर २०२४ - भारत अ विरुद्ध यूएई२३ ऑक्टोबर २०२४ - ओमान विरुद्ध भारत अ२५ ऑक्टोबर - उपांत्य फेरी १, अ गटातील अव्वल विरुद्द ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ २५ ऑक्टोबर - उपांत्य फेरी २, ब गटातील अव्वल विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमाकांचा संघ २७ ऑक्टोबर - अंतिम सामना (सर्व सामने ओमान क्रिकेट अकादमी मैदान, मस्कत येथे होतील)