Join us  

यूएईत होणार MINI IPL; मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स यांनी खरेदी केलेत संघ; जाणून घ्या कधी होणार लीग

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL ) धर्तीवर यूएईत 'MINI-IPL' खेळवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 4:23 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL ) धर्तीवर यूएईत 'MINI-IPL' खेळवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. Emirates T20 League अशी ही लीग असणार असून यात आयपीएलमधील फ्रँचायझी गुंतवणुक करणार आहेत. TOIनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स यांनी या लीगमधील फ्रँचायझी खरेदी केली आहे आणि जानेवारी २०२२मध्ये ६ संघांचा समावेश असलेली ही लीग खेळवण्यात येणार आहे. 

आयपीएलची पाच जेतेपद नावावर असलेला मुंबई इंडियन्स, शाहरूख खानची नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्समध्ये ५०% भागीदारी असलेले किरण कुमार गांधी यांनी Emirates T20 Leagueमधील फ्रँचायझी खरेदी केली आहे. आयोजकांनी चेन्नई सुपर किंग्सलाही गुंतवणुक करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अखेरच्या क्षणी CSK नं या लीगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.  

आयपीएल आणि Emirates T20 League यांच्यातील कनेंक्शन येथेच संपत नाही.   

  • मुंबई इंडियन्स
  • शाहरुख खानचा कोलकाता नाइट रायडर्स 
  • दिल्ली कॅपिटल्समध्ये ५० टक्के गुंतवणुक असलेले किरण कुमार गांधी 
  • कॅप्री ग्लोबल - आयपीएल २०२२मध्ये नव्या संघासाठी यांनी बोली लावली होती
  • ग्लेझर फॅमिली- मँचेस्टर युनायटेडचे मालक यांनीही आयपीएलच्या नव्या संघासाठी उत्सुकता दाखवली होती.
  • सिडनी सिक्सर्स - बिग बॅश लीगमधील संघ 
  • आयपीएलचे CEO सुंदर रमण यांच्या संकल्पनेतून ही लीग खेळवली जाणार आहे.  Emirates Cricket Board चे मालकी हक्क असलेल्या लीगला ICCनं मान्यता दिली आहे.  
टॅग्स :मुंबई इंडियन्सटी-20 क्रिकेटआयपीएल २०२१संयुक्त अरब अमिरातीकोलकाता नाईट रायडर्स
Open in App