मुंबई : क्रिकेटच्या मैदानातील बरेच व्हिडीओ वायर होतात. त्यामध्ये बऱ्याचदा ते क्रिकेटपटूंचे असतात, काही वेळा त्यांच्या मुलांचे किंवा बायकांचे असतात. पण सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मैदानातील एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओतील मुलगी आणि बाबा हे कोणी क्रिकेटपटू नाहीत. हे दोघे सेलिब्रेटीही नाहीत. पण त्यांच्या मनातील खऱ्या भावना या व्हिडीओमध्ये कैद करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हा इमोशन व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.
नेमकं घडलं तरी काय...
वानखेडे स्टेडियमवर मुंबई टी-२० लीगमधील एक सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात एका मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कारण या मुलीने एक फलक बनवला होता. या फलकावर तिने, माझे बाबा कॅमेराच्या मागे आहेत, असे लिहिले होते. हा फलक पाहिल्यावर काही जणं भावुक झाले. कारण हिचे बाबा स्क्रीनवर कधीही दिसणार नाहीत, हे दु:ख या मुलीला झाले असल्याचे काही जणांना वाटले. पण खरा चमत्कार तर त्यानंतर घडला....
चमत्कार नेमका घडला तरी काय... सामन्यातील एक षटक संपले. त्यानंतर या मुलीवर कॅमेरा फिरवण्यात आला. यावेळी तिची आईदेखील तिच्याबरोबर बसली होती. यावेळी तिच्या आईने कॅमेरा आपल्याकडे वळल्यावर मुलीला सांगितले. कॅमेरामध्ये येऊन मोठ्या स्क्रीनवर झळकल्याचा आनंद गगनात मावेनासा होता. पण मोठी गंमत त्यानंतर घडली. कारण यावेळी दुसऱ्या कॅमेरामनने तिच्या बाबांना दाखवले. बाबांनीही आपल्या मुलीला हात उंचावून दाखवला आणि बऱ्याच जणांच्या डोळ्यात आपसूकच आनंदाश्रू तरळले.
व्हिडीओला कसा मिळाला प्रतिसाद
हा व्हिडीओ २४ डिसेंबरला शेअर करण्यात आला. आतापर्यंत हा लाखो लोकांनी पाहायला आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी शेअर करत त्यावर आपली कमेंटही लिहीली आहे.