Indian Team Full Schedule : मागील नोव्हेंबर महिन्यापासून घरच्या मैदानावर खेळलेल्या 7 मालिकांमध्ये भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखली आहे. न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेत भारत अपराजित राहिला आहे. आता घरचे मैदान गाजवल्यानंतर भारतीय संघ पुढील 3-4 महिने परदेशात खेळणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या 'परदेशवारी'ला सुरुवात होणार आहे.
भारतीय संघाचे आगामी दौरे...
- वि. आयर्लंड ( ट्वेंटी-20 मालिका) - 26 व 28 जून
भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक.
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- चार दिवसीय सराव सामना वि. लेइसेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्लब - २४ ते २७ जून
- भारत अ वि. डर्बिशायर ट्वेंटी-२० - १ जुलै
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा
ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
- दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
- तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
- पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
- दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
- तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
भारताचा वेस्ट इंडिज दौरा-
- २२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
- २४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
- २७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
- २९ जुलै - पहिली टी२० - पोर्ट ऑफ स्पेन
- १ ऑगस्ट - दुसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस
- २ ऑगस्ट - तिसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस
- ६ ऑगस्ट - चौथी टी२० - फ्लोरिडा
- ७ ऑगस्ट - पाचवी टी२० - फ्लोरिडा
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)
त्यानंतर झिम्बाब्वे, श्रीलंका दौरे होणार असून आशिया चषक स्पर्धा होणार आहे.