Join us  

दिग्विजयी धोनीयुगाची अखेर!; रनआऊट ते रणआऊट

धोनीची उपलब्धी केवळ खेळापुरती मर्यादित नाही. ती देशाशी संबंधित आहे. हा वारसा सहजासहजी विसरणे शक्य नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 5:08 AM

Open in App

अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमतमहेंद्रसिंग धोनी. एक दुर्लभ प्रतिभावान खेळाडू. स्वत:मागे मोठा वारसा सोडणारा क्रिकेटपटू. हा वारसा येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या स्मरणात राहील, असाच आहे. प्रत्येक पिढीसाठी हा वारसा आदर्श असेल. धोनीची उपलब्धी केवळ खेळापुरती मर्यादित नाही. ती देशाशी संबंधित आहे. हा वारसा सहजासहजी विसरणे शक्य नाही.धोनी गाथेचे तीन पैलू आहेत. एकतर क्रिकेटपटू, दुसरी क्रिकेटपटूमागे दडलेली व्यक्ती आणि या दोन्ही व्यक्तिरेखांचे संयुक्त मिश्रण म्हणजे राष्टÑ, क्रिकेट आणि चाहत्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारे व्यक्तिमत्त्व. सर्वांवर बारकाईने नजर टाकल्यास त्याचे विक्रम आणि भावी पिढीसाठी निर्माण केलेले आदर्श गवसतील.कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास एका चॅम्पियन क्रिकेटपटूचे दर्शन घडते. तिन्ही प्रकारातील त्याची धावांची सरासरी बोलकी आहे. यष्टिमागे घेतलेले झेल आणि स्टम्पिंग करण्याची लालसा पाहिल्यास धोनीच्या शरीराच्या लवचिकतेची कल्पना येते. भारतीय क्रिकेटमध्ये कुणीही यष्टिरक्षक-फलंदाज धोनीची ही आकडेवारी स्वत:पुरते आव्हान म्हणून स्वीकारू शकेल. कुमार संगकारा, अ‍ॅन्डी फ्लॉवर, ब्रेंडन मॅक्युलम, अ‍ॅडम गिलख्रिस्ट हे आधुनिक क्रिकेटमधील काही शानदार यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. तथापि तटस्थ नजरेतून पाहिल्यास धोनीने या सर्वच दिग्गजांना मागे टाकले आहे. (पान ७ वर)(पान १ वरून)फ्लॉवर, संगकारा आणि मॅक्युलम यांनी निवृत्त होण्याआधी पूर्णपणे किंवा काही प्रकारात यष्टिरक्षण करणे सोडून दिले होते.त्यांच्यावर धोनीच्या तुलनेत कमी जबाबदारी होती. क्रिकेट खेळणाºया प्रत्येकाला हे माहीत असेल की धोनीकडून इतक्या मोठ्या जबाबदाºया कशा पूर्ण झाल्या असतील, धोनीसारखा गिलख्रिस्ट देखील आंतरराष्टÑीय कारकिर्दीत यशस्वी ठरला. कसोटीत त्याची आकडेवारी धोनीच्या तुलनेत सरस असेल. मात्र गिलख्रिस्टला धोनीसारखी नेतृत्वाची जबाबदारी पेलावी लागली नाही.त्यामुळेच त्याला धोनीसारखा दडपणाचा सामना करावा लागला नाही.धोनीने स्वत:च्या आक्रमक वृत्तीतून बलाढ्य फलंदाजाची व्याख्या लिहिली. त्याच्यात आश्चर्यकारक ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारण्याची तसेच ‘फिनिशर’ बनण्याची अपार क्षमता होती. कर्णधार या नात्याने धोनी थोडा राखीव स्वभावाचा होता. २००७ मध्ये पाकविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरचे षटक जोगिंदर शर्माला सोपवताच धोनी थोडा स्पष्ट झाला होता. त्याने पारंपरिक क्रिकेटच्या विरोधात जाण्याची अनेक उदाहरणे सादर केली.मी नेतृत्वाबाबत बोलतो आहे. कर्णधारपद सांभाळल्याने खेळाडूचे अधिक नुकसान होते. धोनीच्या तुलनेत संगकारा, मॅक्युलम आणि फ्लॉवर हे अल्पकाळ कर्णधार होते. कर्णधार या नात्याने धोनी दडपणासह परिस्थितीला सामोरा जायचा. त्याने भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून दिली. आयसीसीच्या तिन्ही महत्त्वपूर्ण ट्रॉफीचे जेतेपद पटकावणे अभूतपूर्व कामगिरी म्हणावी लागेल. याच बळावर भारत २००९-१० ला कसोटीत नंबर वन झाला. नंतर दोन वर्षे ही बिरुदावली टिकवून ठेवली. आयपीएलमध्ये फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही आघाड्यांवर सीएसकेसाठी तो ‘मैलाचा दगड’ ठरला आहे. धोनीने अनेकदा चुणूक दाखवून यष्टिमागे गडी बाद केल्याने कोच आणि जाणकारही तोंडात बोटे घालायचे. त्याचे तंत्र पारंपरिक होते. टीकाकारांना वाटायचे धोनी लवकर संपेल. पण धोनीने शोधलेले ‘नवे तंत्र नव्या युगाच्या क्रिकेट पाठ्यक्रमाचा’ एक भाग बनले आहे. टीकाकार आणि जाणकारांना हुलकावणी देत स्वत:चे म्हणणे खरेही ठरवले. धोनी सुरुवातीला हिट ठरला तो मोठे फटके आणि हेअरस्टाईलमुळे. पाकिस्तानचे माजी राष्टÑपती परवेझ मुशर्रफ यांनी २००५-०६ ला पाक दौºयादरम्यान धोनीच्या खेळाची जोरदार प्रशंसा केली होती. रांचीसारख्या लहान क्षेत्रातून आलेल्या या खेळाडूने रेल्वेतील क्रिकेट कलेक्टरची नोकरी मागे टाकून भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च शिखर गाठले. आंतरराष्टÑीय क्रिकेटच्या पहिल्या चेंडूवर धावबाद झालेल्या धोनीची सुरुवात कठीण होती पण श्रीलंकेविरुद्ध दहा षटकारासह १८३ धावा ठोकताच एका स्टार खेळाडूचा जन्म झाला. या नंतरच्या दशकात धोनीने दाखवून दिले की तो केवळ भारताचा पोस्टर बॉय नाही तर त्याच्यात शहरी युवकांचा स्टाईल आयकॉन आणि बरेच काही बनण्याची क्षमता आहे. मेहनत जिद्द आणि समर्पित भावनेच्या बळावर पुढे येऊ शकणाºया अनेक खेळाडूंना माहीने प्रेरणा दिली आहे.स्टारडम, प्रसिद्धी आणि पैसा हे सर्व असताना माही यष्टिरक्षणात कधीही कमी पडला नाही. कठोर मेहनतीला पर्याय नाही, हे सतत डोक्यात ठेवूनच त्याची वाटचाल होती.त्याच्या संपर्कात असलेले खेळाडू धोनीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करायचे. एक चॅम्पियन क्रिकेट आणि कर्णधार म्हणून धोनीची कथा तितकीच ‘सस्पेन्स’ राहिली. उदाहरण द्यायचे तर आॅस्ट्रेलियात त्याने एका मालिकेदरम्यान अचानक कसोटीतून नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला.रवी शास्त्री यांच्यानुसार त्यावेळी जे कुणी ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित होते त्यांच्या पायाखालची वाळू क्षणभर सरकली होती. त्याचवेळी चेहºयावर हास्य असलेली एकमेव व्यक्ती होती, ती म्हणजे धोनी.देशाच्या स्वतंत्र्यदिनी इन्स्टाग्रॅमवर एका पोस्टद्वारे माहीने निवृत्ती जाहीर केली.>स्टारडम, प्रसिद्धी आणि पैसा हे सर्व असताना माही यष्टिरक्षणात कधीही कमी पडला नाही. कठोर मेहनतीला पर्याय नाही, हे सतत डोक्यात ठेवूनच त्याची वाटचाल होती.त्याच्या संपर्कात असलेले खेळाडू धोनीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करायचे.>भारतीय क्रिकेटचा ‘कोहिनूर’, जिगरी दोस्त आहे माहीमाहीवर जितका गर्व करावा तितका कमी आहे. भारतीय क्रिके ट विश्वाला अनेक हिरे मिळतील, पण माहीसारखा कोहीनूर मिळणार नाही. चार वर्षांपासून आमची दोस्ती आहे. आम्ही नर्सरीपासून सोबत आहोत. तो पुढे गेला.. यशाच्या शिखरावर पोहोचला.. पण माही माहीच राहिला. सेलिब्रिटी झाला म्हणून धोनी मित्रांना विसरला नाही. त्याने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. पण, तो रांचीचाच मुलगा जराही बदलला नाही. त्याचं वागणं जसं होतं तसंच आहे. मैदानावर जेवढा तो शांत असतो, तेवढा तो मित्रांमध्ये मात्र नसतो. तो मस्ती करतो. क्रिके ट सोडून सगळ््या चर्चा करतो. आम्हाला त्याचा अभिमान आहे. भविष्यात तो काय करेल, हा त्याचा निर्णय आहे. - सीमांत लोहानी (चिट्टू)>एक दिवस प्रत्येकाचा प्रवास संपतो. परंतु, तुमच्या जवळच्या व्यक्तीने निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मन भरुन येतं. तू या देशासाठी जे काही केल आहेस, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिल. तुझ्याकडून मिळालेला मान आणि प्रेम हे नेहमी माझ्याजवळ राहील. लोकांनी तुझं यश पाहिलं आहे, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे. धन्यवाद. - विराट कोहली>तुझ्यासोबतीने जिंकलेले २०११ सालचे विश्वविजेतेपद माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असून भारतीय क्रिकेटसाठी तू मोलाचे योगदान दिले आहेस. तुला आणि तुझ्या कुटुंबाला दुसºया इनिंगसाठी शुभेच्छा. - सचिन तेंडुलकर>खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्यासोबत डेÑसिंग रुम शेअर करणे अभिमानाची बाब आहे. भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूला माझा सलाम. आनंदी रहा. - रवी शास्त्री, प्रशिक्षक - टीम इंडिया>आता असा खेळाडू निर्माण होणे म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबल’ आहे. धोनीसारखा ना कोणी होता, ना कोणी आहे आणि ना कोणी होईल. खेळाडू येतील आणि जातील, पण धोनी इतका धैर्यवान कोणी नसेल. धोनी क्रिकेटशी अशाप्रकारे जुळला की अनेक क्रिकेटप्रेमींसाठी तो त्यांच्या घरचा सदस्याप्रमाणे होता. ओम फिनिशाय नम:! - वीरेंद्र सेहवाग

तुझ्या कामगिरीचा आणि एक व्यक्ती म्हणून मला तुझा अभिमान आहे. मला माहितेय, या क्षणाला तुझे डोळे पाणावलेले असणार, पण तू अश्रू रोखून धरले असतील. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. - साक्षी धोनी

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी