Join us  

Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी!

न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले अन् पहिलावहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 6:28 PM

Open in App

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले अन् पहिलावहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंडनं यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. फायनलसाठीची ही त्यांची पूर्वतयारी होती. दुसरीकडे मात्र टीम इंडियाला आपापसात संघ तयार करून तीन दिवसांचा सराव सामना खेळावा लागला. याचा फटका कुठेतरी टीम इंडियाला बसला अशी चर्चा आहे. त्यात फायनलमधील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) केलेल्या विधानावरून त्यानं बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( his team was keen to play first-class before the scheduled five-Test series against England ) 

 आता दक्षिण आफ्रिकेला नव्हे तर टीम इंडियाला म्हणावं लागेल 'Chokers'; आकडेच देत आहेत तसे संकेत!

आता महिन्याभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी विराट कोहली अँड टीमला प्रथम श्रेणी सराव सामना खेळायचा आहे, परंतु त्यांची ही विनंती कोणतंही कारण न देता फेटाळण्यात आली, असे विराटनं बुधवारी सांगितले. आता भारतीय खेळाडूंना तीन आठवड्यांची सुट्टी मिळाली आहे आणि त्यामुळे ते बायो बबल बाहेर पडू शकतात. आजपासून त्यांची ही सुट्टी सुरू झाली आहे. १४ जुलैला त्यांना पुन्हा बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागेल.

Photo : ना प्रतिस्पर्धींना डिवचणारा जल्लोष, ना उगाचच्या उड्या; जेतेपदानंतरही न्यूझीलंड संघानं जपला साधेपणा!

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघाला प्रथम श्रेणी सराव सामना खेळायला मिळाल्यास खेळाडूंना फायदाच होईल, असे कोहलीला वाटतं. परंतु याचा निर्णय प्रवासाचा कार्यक्रम आखणाऱ्या लोकांवर अवलंबून असल्याचेही तो म्हणाला. ''तो निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. या मालिकेपूर्वी आम्हाला प्रथम श्रेणी सराव सामना खेळायचा होता, परंतु तो नाकारण्यात आला आहे. त्यामागचं कारण मलाही माहीत नाही.'' 

पण, त्याचवेळी कोहलीनं तीन आठवड्यांचा सराव कालावधी मालिकेसाठी पुरेसा असल्याचेही त्यानं मान्य केलं. ''कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आम्हाला पुरेसा कालावधी मिळणार आहे,''असे कोहली म्हणाला.

PTIच्या वृत्तानुसार बीसीसीआयनं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे दोन प्रथम श्रेणी सराव सामने रद्द करण्यास सांगितले. ''जुलै महिन्यात भारत अ संघही इंग्लंड दौऱ्यावर येणार होता आणि त्यामुळे वरिष्ठ संघाच्या वेळापत्रकाला त्याचा फटका बसला असता. आम्ही भारत व भारत अ अशा दोन सराव सामन्यांच्या आयोजनाचा विचार करत होतो.  पण, आम्ही येथे जम्बो संघ घेऊन दाखल झालो आणि इंग्लंड बोर्डाशी चर्चा करून सराव सामने रद्द केले,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTIला सांगितले. 

टॅग्स :विराट कोहलीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआय