ben stokes ashes | नवी दिल्ली : सध्या इंग्लंडच्या धरतीवर ॲशेस मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. या सामन्यातील एक वादग्रस्त विकेट आजही वर्तमानपत्रात झळकत आहेत. दुसऱ्या सामन्यातील पराभवापेक्षा इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने अखिलाडीवृत्तीने यष्टिचीत केल्याने वादाला तोंड फुटले.
दरम्यान, अखिलाडीवृत्तीने बेअरस्टोला बाद केल्याचे सांगत इंग्लिश खेळाडूंसह प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने पत्रकार परिषदेतून उघड नाराजी बोलून दाखवली. बेन स्टोक्सला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बेअरस्टोच्या विकेटबद्दल विचारले असता त्याने म्हटले, "मैदानातील पंचांनी काही हालचाल केली होती का? ते निर्णायक षटक होते का? मला माहिती नाही. जॉनी आपल्या क्रीझवर होता आणि नंतर बाहेर पडला. पण त्याला बाद दिले गेले आता मला याविषयी काहीही बोलायचे नाही."
ऑस्ट्रेलियामधील वृत्तपत्र 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन'ने (West Australian) बेन स्टोक्सच्या विधानाचा दाखला देत त्याची खिल्ली उडवली. आपल्या पहिल्याच पानावरच बेन स्टोक्सचा रडणारं मूल असा उल्लेख करत ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने निशाणा साधला. याला स्टोक्सने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले. "तो मी असूच शकत नाही. मी कधी नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली", अशा शब्दांत स्टोक्सने उत्तर दिले, ज्याचे कौतुक केले जात आहे.
नेमकं काय घडलं?
दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावाच्या ५२व्या षटकात कॅमेरून ग्रीनने टाकलेला चेंडू चुकवण्यासाठी जॉनी बेअरस्टो खाली वाकला. चेंडू निर्धाव गेला अन् षटक संपले असे गृहीत धरून बेअरस्टो क्रीझला पाय घासून पुढे गेला. तेवढ्यात ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक कॅरीने चेंडू यष्ट्यांवर मारला आणि कांगारूच्या खेळाडूंनी अपील केली. पण नियमानुसार चेंडू डेड झाला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी बेअरस्टोला बाद केले अन् इंग्लंडला मोठा झटका बसला.
Web Title: eng vs aus ashes series 2023 Australian newspaper The West mocks Ben Stokes as cry babies over Jonny Bairstow's controversial wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.