England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात झाली, परंतु २०१९च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडची पहिल्याच सामन्यात हालत खराब झाली आहे. पण, इंग्लंडने १६ षटकांत ४ फलंदाज अवघ्या ८५ धावांवर गमावले आहेत. मिचेल स्टार्कच्या ( Mitchell Starc ) एका वेगवान चेंडूने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय ( Jason Roy) याचा उडवलेल्या त्रिफळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
T20 World Cup 2024च्या तयारीला लागा, आता सगळ्यांना समान संधी मिळणार- हार्दिक पांड्या
ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॅट कमिन्स आणि स्टार्क यांनी इंग्लंडच्या सलामीवीरांना ५ षटकांच्या आत माघारी पाठवले. कमिन्सने चौथ्या षटकात फिल सॉल्ट ( १४) याची विकेट घेतली. स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. त्यानंतर एका चेंडूच्या अंतराने स्टार्कने भन्नाट इनस्वींगर चेंडू टाकला अन् रॉय ( ६) त्यावर निरुत्तर झाला.
स्टार्कने टाकलेल्या चेंडूने रॉयचा त्रिफळा उडवला अन् इंग्लंडचा दुसरा ओपनरही २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कमिन्स व मार्कस स्टॉयनिस यांनी पुन्हा धक्के दिले. जेम्स व्हिंसी ( ५) व सॅम बिलिंग्स ( १७) माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ४ बाद ६६ अशी झाली. डेव्हिड मलान व कर्णधार जोस बटलर खेळत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"