Join us  

ENG vs BAN : मलानची 'विक्रमी' खेळी! भारतातील वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा ठरला तिसरा इंग्लिश खेळाडू

ENG vs BAN live match : प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 2:27 PM

Open in App

गतविजेत्या इंग्लंडनेबांगलादेशची पळता भुई थोडी केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर डेव्हिड मलानने विक्रमी शतक झळकावत भारतीय भूमीवर इतिहास रचला. खरं तर भारतातील विश्वचषकात शतक झळकावणारा तो तिसरा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे सामना खेळवला जात आहे. डेव्हिड मलानने आपल्या वन डे कारकिर्दीतील सहावे शतक झळकावून बांगलादेशसमोर तगडे आव्हान उभारले. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९१ चेंडूत शतक पूर्ण केले. तसेच चालू विश्वचषकात इंग्लिश संघाकडून शतक झळकावणारा तो पहिला शिलेदार ठरला आहे. 

डेव्हिड मलानला वगळता केवळ दोन इंग्लिश फलंदाजांना भारतातील विश्वचषकात शतक झळकावता आले आहे. ग्रॅहम गूचने १९८७ मध्ये मुंबईत भारताविरुद्ध ११५ धावा केल्या होत्या तर अँड्र्यू स्ट्रॉसने २०११ च्या विश्वचषकात बंगळुरू येथे यजमान भारताविरूद्ध १५८ धावांची खेळी केली होती. स्फोटक खेळी करून बांगलादेशची डोकेदुखी वाढवणाऱ्या मलानला बाद करण्यात महेदी हसनला यश आले. १०७ चेंडूत १४० धावा करून मलान तंबूत परतला. त्याला त्याच्या खेळीत पाच चौकार आणि सोळा षटकार मारण्यात यश आले. 

विश्वचषकात शतक झळकावणारे इंग्लंडचे सलामीवीर -

  1. डीएल एमिस - १८७५, 137 धावा. 
  2. ग्रॅहम गूच - १९८७, ११५ धावा.
  3. आन्रे स्ट्रॉस - २०११, १५८ धावा.
  4. मोईन अली - २०१५, १२८ धावा.
  5. जेसन रॉय - २०१९, १५३ धावा. 
  6. जो रूट - २०१९, १०० धावा.
  7. जॉनी बेअरस्टो - २०१९, १११ आणि ११६ धावा.
  8. डेव्हिड मलान - २०२३, १४० धावा.

 दरम्यान, गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बांगलादेशविरूद्धचा सामना इंग्लिश संघासाठी महत्त्वाचा आहे. डेव्हिड मलानने स्फोटक सुरूवात करून दिल्यानंतर सर्वच इंग्लिश फलंदाजांनी हात साफ केले अन् बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइंग्लंडबांगलादेशभारत