Join us  

Big News IND vs ENG : टीम इंडियाचा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला खेळाडू कोण ते समजलं; यूरो स्पर्धा पाहणं महागात पडलं?

Indian Player Tested Covid-19 Positive : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २३ सदस्यीय टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी येऊन धडकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:15 AM

Open in App

Indian Player Tested Covid-19 Positive : इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २३ सदस्यीय टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोना झाल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी येऊन धडकले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर होते. या सुट्टीत खेळाडूंनी कुटुंबीयांसोबत भटकंती केली, काहींनी यूरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या, तर काहींनी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या सामन्यांना हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा बायो बबलमध्ये परतल्यानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली गेली अन् त्यात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापैकी एकाचा रिपोर्ट दुसऱ्या टेस्टमध्ये निगेटिव्ह आला असून पॉझिटिव्ह असलेल्या खेळाडूला विलगिकरणात ठेवले गेले आहे. हा खेळाडू इतर खेळाडूंसह डरहॅम येथे प्रवास करणार नाही. 'स्पोर्ट्स तक' नं दिलेल्या वृत्तानुसार रिषभ पंत ( Rishabh Pant) याचा कोरोना रिपोर्ट आठवड्यापूर्वी पॉझिटिव्ह आला आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ( ENG vs INDRishabh Pant is the Indian player who tested positive for COVID-19 in England)  बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक मेल पाठवला होता. २० दिवसांच्या सुट्टीनंतर खेळाडू डरहॅम येथील बायो बबलमध्ये दाखल झाले आणि त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ''होय एका खेळाडूला कोरोना झाला आहे. त्याला सध्या विलगिकरणात ठेवले गेले आहे आणि तो इतर सदस्यांसोबत प्रवास करणार नाही,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक

४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघरिषभ पंत