लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने दुबळ्या आयर्लंडसमोर गुडघे टेकले. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर आजपासून सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली. वयाच्या 38व्या वर्षी तिसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. विशेष म्हणजे मुर्ताघचा जन्म हा लंडनचाच आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यानं घरच्याच संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. इंग्लंडचा संपूर्ण संघ 23.4 षटकांत 85 धावांत तंबूत परतला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs IRE : विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लंडसमोर गुडघे टेकले; संपूर्ण संघ 23.4 षटकांत तंबूत
ENG vs IRE : विश्वविजेत्या इंग्लंडने आयर्लंडसमोर गुडघे टेकले; संपूर्ण संघ 23.4 षटकांत तंबूत
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 5:42 PM