लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडचे तीन फलंदाज 36 धावांवर माघारी पाठवून आयर्लंडने सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते 116 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जेसन रॉयकडे. रॉयचा हा पहिलाच कसोटी सामना होता, परंतु त्याला अपेक्षांवर खरे उतरता आले नाही.
पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण अन् आज आयर्लंडकडून खेळणार; कोण आहे हा खेळाडू ?लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या लढतीत इंग्लंडचाच खेळाडू यजमानांच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे. पाच वर्षांपूर्वी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं पदार्पण केले होते आणि आज होणाऱ्या सामन्यात तो आयर्लंडचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाणून घ्या कोण आहे तो...बॉयड रँकिन असे या खेळाडूचे नाव आहे. त्याने इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. 6 फुट 7 इंच इतकी उंची असलेला रँकिन डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. 5 जुलै 1984 मध्ये लंडन येथे त्याचा जन्म झाला होता. त्याने 2014 मध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्या एकमेव कसोटीत त्यानं 13 धावा देत एक विकेट घेतली होती.