ENG vs IRE, T20 World Cup : आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video 

England vs Ireland, T20 World Cup : ग्रुप १ मध्ये २ गुणांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडसमोर आज कट्टर प्रतिस्पर्धी आयर्लड आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:18 AM2022-10-26T11:18:31+5:302022-10-26T11:18:58+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs IRE, T20 World Cup : Balbirnie gets forward and drives. The ball is misfielded by Rashid and the ball runs onto the stumps at the bowlers end and Tucker is then run out, Video  | ENG vs IRE, T20 World Cup : आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video 

ENG vs IRE, T20 World Cup : आयर्लंडच्या फलंदाजांनी इंग्लंडची धुलाई केली; पण, सेट जोडी विचित्र पद्धतीने तुटली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Ireland, T20 World Cup : ग्रुप १ मध्ये २ गुणांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडसमोर आज कट्टर प्रतिस्पर्धी आयर्लड आहे. आयर्लंडने यापूर्वीही इंग्लंडला मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा झटका दिला आहे. आज पावसामुळे सामना थोडा उशीरा सुरू झाला, परंतु आयर्लंडने वादळी सुरुवात करून इंग्लंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. पॉल स्टर्लिंगने ८ चेंडूंत १४ धावा करताना आक्रमक सुरुवात करून दिली. मार्क वूडने त्याची विकेट घेतली. अँड्य्रू बॅलबर्नली व लॉकर टकर यांनी सुरेख फटेकबाजी करताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५०+धावा फलकावर चढवल्या. चेंडू सहज बॅटवर येत होता अन् आयर्लंडचे फलंदाज त्यावर खणखणीत फटकेबाजी करत होते. ख्रिस वोक्सने टाकलेल्या १०व्या षटकात बॅलबर्नीने १८ धावा चोपल्या आणि आयर्लंडने ९२ धावा फलकावर चढवल्या.

विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; शोएब अख्तरने मागणी करताना सांगितले विचित्र कारण

१२व्या षटकात आदिश रशिदच्या गोलंदाजीवर आयर्लंडची ही सेट जोडी विचित्र पद्धतीने माघारी परतली. बॅलबर्नलीने मारलेला चेंडू रशिदच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडवरील स्टम्प्सवर आदळला. टकर बराच पुढे आला होता आणि त्याला रन आऊट होऊन माघारी परतावे लागले. टकर ( ३४) बाद झाल्याने ५७ चेंडूंत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही तुटली. नवा फलंदाज मैदानावर आल्यावर मार्क वूडला बोलावले गेले आणि त्याने हॅरी टेक्टरला ( ०) बाद केले. 

पाहा विकेट

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

Web Title: ENG vs IRE, T20 World Cup : Balbirnie gets forward and drives. The ball is misfielded by Rashid and the ball runs onto the stumps at the bowlers end and Tucker is then run out, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.