लंडन - क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच मैदानात उतरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्सवर सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली आहे. इंग्लंडचे सात फलंदाज 43 धावांत माघारी परतले होते. वयाच्या 38व्या वर्षी तिसराच कसोटी सामना खेळणाऱ्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. विशेष म्हणजे मुर्ताघचा जन्म हा लंडनचाच आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर त्यानं घरच्याच संघाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs IRE : लंडनमध्ये जन्मलेल्या 'या' गोलंदाजासमोर विश्वविजेत्या इंग्लंडची शरणागती
ENG vs IRE : लंडनमध्ये जन्मलेल्या 'या' गोलंदाजासमोर विश्वविजेत्या इंग्लंडची शरणागती
ENG vs IRE : Timothy Murtagh takes his maiden Test five-wicket haul in his home ground against home team, England loss 7 wickets in 43 runs
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 5:15 PM