ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) यांनी वातावरण बदलले. टी ब्रेकपूर्वी हे दोघं वन डे स्टाईल खेळत होते, पण ब्रेकनंतर अचानक बेअरस्टोने ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी सुरू केली. स्टोक्स व बेअऱस्टो यांनी ९ षटकांत १०२ धावा चोपल्या. बेअरस्टोने शतक झळकावले, परंतु त्यासाठी १ चेंडू कमी खेळला असता तर १२० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली असती.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूट व ऑली पोप यांच्या शतकांच्या जोरावर ५३९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव २८४ धावांवर गडगडला. विल यंग ( ५६), डेव्हॉन कॉनवे ( ५२) व डॅरील मिचेल ( ६२*) यांनी अर्धशतक झळकावले. स्टुअर्ट ब्रॉड ( ३-७०), जेम्स अँडरसन ( २-२०) व मॅथ्यू पॉट्स ( २-३२) यांच्या सुरेख कामगिरीने इंग्लंडला विजयाची किरण दाखवली. न्यूझीलंडने विजयासाठी अखेरच्या दिवशी ठेवलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ४ फलंदाज ९३ धावांवर माघारी परतले होते. पण, त्यानंतर स्टोक्स व बेअरस्टोची फटकेबाजी रंगली.
बेअरस्टोने ७७ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे कसोटीतील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने बेन स्टोक्सचा २०१५ सालचा ८५ चेंडूंत शतकाचा ( वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला. इंग्लंडकडून गिलबर्ट जेसोप यांनी १९२०साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ चेंडूंत शतक झळकावले होते. बेअरस्टोच्या शतकी खेळीत ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. त्याने स्टोक्ससोबत १५०+ भागीदारी केली आहे. तो सध्या ८८ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकारांसह १२७ धावांवर खेळतोय, तर स्टोक्स ५० धावांवर खेळतोय. इंग्लंडने ४ बाद २५४ धावा केल्या असून त्यांना ४५ धावा करायच्या आहेत.
Web Title: ENG vs NZ 2nd Test : 100 in just 77 balls for Johnny Bairstow, ODI batting before tea and T20 batting after tea, becomes the 2nd fastest England batsman to score a century in Test cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.