ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय विजयाची नोंद केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाचव्या दिवसाच्या टी ब्रेकनंतर ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी करून विजयाचा मार्ग सहज सोपा केला. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) यांनी वातावरण बदलले. पाचव्या दिवसाच्या अखेरच्या दोन सत्रांत विजयासाठी २५०+ धावांची गरज असताना या दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चौकार भारत-न्यूझीलंड लढतीत लागले. अखेरच्या सत्रात विजयासाठी हव्या असलेल्या १६० धावा इंग्लंडने १६ षटकांत केल्या.
बेअरस्टोने ७७ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे कसोटीतील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने बेन स्टोक्सचा २०१५ सालचा ८५ चेंडूंत शतकाचा ( वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला. इंग्लंडकडून गिलबर्ट जेसोप यांनी १९२०साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ चेंडूंत शतक झळकावले होते. बेअरस्टोच्या शतकी खेळीत ९ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. बेअरस्टो ९२ चेंडूंत १४ चौकार व ७ षटकारांसह १३६ धावांवर बाद झाला. त्याने पाचव्या विकेट्ससाठी १२१ चेंडूंत १७९ धावांची भागादारी केली. स्टोक्सने नाबाद ७५ धावांची खेळी करून इंग्लंडला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. इंग्लंडने ही WTC मध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली.