Join us  

Daryl Mitchell, ENG vs NZ 3rd Test : डॅरिल मिचेलने न्यूझीलंडचा डाव सावरला, ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंड दौरा गाजवला, Video 

ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत किवींचे ५ फलंदाज १२३ धावांवर माघारी परतले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 5:49 PM

Open in App

ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत किवींचे ५ फलंदाज १२३ धावांवर माघारी परतल्यानंतर Daryl Mitchell व Tom Blundell ही जोडी खेळपट्टीवर अडून बसली. दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. ब्लंडल जेव्हा बाद झाला तेव्हा DRS बंद पडला होता आणि त्यामुळे त्याला मैदानावरील अम्पायरचा निर्णय अंतिम मानून माघारी जावे लागले. डॅरिल मिचेलने शतक झळकावून १९४९ सालचा मोठा विक्रम मोडला. मिचेलची विकेट पडल्यानंतर लंच ब्रेक घेतला गेला अन्  न्यूझीलंडच्या ८ बाद ३२५ धावा झाल्या आहेत. 

केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अंगलट आला. केनचा फॉर्म याही लढतीत त्याच्यावर रुसला. टॉम लॅथमला भोपळ्यावर माघारी पाठवून स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडला यश मिळवून दिले. त्यानंतर विल यंग ( २०), केन ( ३१), डेव्हॉन कॉनवे ( २६) यांनाही मोठी खेळी करू दिली नाही. किवींचा निम्मा संघ १२३ धावांवर माघारी परतला होता. तेव्हा मिचेल व ब्लंडल ही जोडी खेळपट्टीवर संघर्ष करत राहिली. ब्लंडलने १२२ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावा केल्या. त्यानंतर मिचेल ब्रेसवेल ( १३ ) व टीम साऊदी ( ३३*) यांनी डॅरिलला साथ मिळाली. डॅरिल २२८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर बाद झाला.

इंग्लंडविरुद्घच्या मालिकेतील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध सलग तीन शतकं झळकावली. या मालिकेत डॅरिलने 13(35), 108(203), 190(318), 62*(131) व 109(228) अशी धावसंख्या केली आहे. इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत किवींकडून सर्वाधिक ४६३* धावा करण्याचा पराक्रम डॅरिलने नावाव र केला. यापूर्वी १९४९ मध्ये मार्टिन डोनेल्ली यांनी ४ सामन्यांत ४६२ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंड
Open in App