England vs New Zealand 3rd Test : मालिकेत आधीच ०-२ असे पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडची तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर वाताहत झालेली दिसतेय. नशीबही इंग्लंडची साथ देतोय असं म्हणावं लागेल, कारण त्यांना विचित्र पद्धतीने विकेटही मिळत आहेत.
केन विलियम्सनच्या पुनरागमनानंतर न्यूझीलंडचा खेळ उंचावेल असे वाटले होते. पण, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. केनचा फॉर्म याही लढतीत त्याच्यावर रुसला. टॉम लॅथमला भोपळ्यावर माघारी पाठवून स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडला यश मिळवून दिले. त्यानंतर विल यंग ( २०), केन ( ३१), डेव्हॉन कॉनवे ( २६) यांनाही मोठी खेळी करू दिली नाही. ब्रॉड व जेमी ओव्हरटर्न यांच्यानंतर जॅक लिचने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यातली एक विकेट घेण्यात तर न्यूझीलंडच्या फलंदाजानेच त्याची मदत केली.
हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल मैदानावर असताना लिच गोलंदाजीवर आला. निकोल्स स्ट्राईकवर होता अन् त्याने सरळ फटका मारला, परंतु तो नॉन स्ट्राईकरला उभ्या असलेल्या मिचेलच्या बॅटला लागून मिड ऑफच्या दिशेने गेला. तिथे उभ्या असेलेल्या अॅलेक्स लीसने सोपा झेल टिपला. या विकेटमुळे किवींचा निम्मा संघ १२३ धावांवर माघारी परतला.
Web Title: ENG vs NZ 3rd Test : One of the most unfortunate dismissal for Henry Nicholls, new zealand loss 5 wickets in 123 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.