Glenn Phillips Mark Wood, Video: भन्नाट सिक्स! ज्या वेगाने चेंडू आला, त्याच वेगाने स्टेडियममध्ये पाठवला...

वेगाने आलेला चेंडू पायाजवळ येताच फिलिप्सने बॅट फिरवली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 05:51 PM2022-11-01T17:51:20+5:302022-11-01T17:54:55+5:30

whatsapp join usJoin us
ENG vs NZ Glenn Phillips Huge six on Mark Wood superfast 150+ bowling video goes viral in T20 World Cup 2022 | Glenn Phillips Mark Wood, Video: भन्नाट सिक्स! ज्या वेगाने चेंडू आला, त्याच वेगाने स्टेडियममध्ये पाठवला...

Glenn Phillips Mark Wood, Video: भन्नाट सिक्स! ज्या वेगाने चेंडू आला, त्याच वेगाने स्टेडियममध्ये पाठवला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Glenn Phillips Mark Wood, Video: इंग्लंडचा मार्क वुड त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याचा वेग काही वेळा फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. आज तो ICC T20 World Cup 2022 मध्ये इंग्लंडकडून खेळत होता. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध आपली वेगवान गोलंदाजी सर्वांना दाखवून दिली. वुडने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंतचा स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने त्याच वेगाने तो चेंडू सीमारेषेपार पोहोचवला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ६ विकेट्स गमावून १७९ धावा केल्या. या आव्हानाचा बचाव करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला, तेव्हा त्यांच्या गोलंदाजीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. वुड देखील दमदार गोलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानल्या जातात आणि येथे बाउन्सही चांगला असतो. त्यानुसार ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर वुडने आपली वेगवान गोलंदाजी दाखवून दिली. इंग्लंडने हा सामनाही २० धावांनी जिंकला. पण चर्चा रंगली ती फिलिप्सच्या षटकाराची.

वुडने डावातील १२वे षटक टाकले. या षटकात त्याने वेगवान गोलंदाजी केली. त्याने ओव्हरचा तिसरा चेंडू ताशी १५२ किमी वेगाने टाकला. यावेळी फिलिप्सने हा चेंडू बॅटच्या मध्यभागी घेऊन षटकार मारला. वुडने हा बॉल फिलिप्सच्या पायाजवळ दिला होता, तो फिलिप्सने बॅटच्या मध्यभागी घेतला आणि लाँग ऑनला सिक्सर मारला.

त्याआधी मार्क वुडने न्यूझीलंडच्या डावातील सहावे षटक टाकले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपला स्पीड दाखवून दिला. वुडने स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला. वुडचा हा चेंडू ताशी १५५ किलोमीटर इतका होता. तो चेंडू सर्वात वेगवान ठरला. पण त्यावर त्याला चौकार खावा लागला.

 

Web Title: ENG vs NZ Glenn Phillips Huge six on Mark Wood superfast 150+ bowling video goes viral in T20 World Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.