Join us  

6 Fielders in Slips, Eng vs Nz Viral Photo: स्लिपमध्ये तब्बल ६ फिल्डर्स... इंग्लंडची नवी रणनिती Social Media वर हिट!

इंग्लंडचा संघ नवीन प्रशिक्षक आणि नवा कर्णधार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 2:45 PM

Open in App

6 Fielders in Slips, Eng vs Nz Viral Photo: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना आता रोमांचक वळणावर पोहोचला आहे. पहिल्याच दिवशी १७ विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामन्यात चांगलीच रंगत आली. दरम्यान, टेस्ट मॅचचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यात कसोटी क्रिकेटची विशेष ओळख दिसून येत आहे. इंग्लंडनेन्यूझीलंडच्या फलंदाजी दरम्यान ६ स्लिप फिल्डर्स लावले. त्यावरून त्यांचे आक्रमक क्षेत्ररक्षण दिसून आले. या फोटोमुळे क्रिकेट चाहतेही खूप खुश झाले. कारण बऱ्याच दिवसांनी असे चित्र पाहून आनंद झाला.

कसोटी क्रिकेटमध्ये स्लिपमध्ये दोन फिल्डर दिसणे ही फारशी मोठी गोष्ट नाही. पण या सामन्यात चक्क ६ स्लिप फिल्डर्स लावल्याचं दिसल्याने सारेच अवाक् झाले. असे असलं तरीही ६ क्षेत्ररक्षक पाहून चाहते एका अर्थी सुखावले. पण इंग्लंडच्या नव्या संघाकडे पाहताना हा बदल स्पष्टपणे दिसून आले. इंग्लंडच्या कसोटी संघाला नुकताच ब्रेंडन मॅक्युलम हा नवा कसोटी प्रशिक्षक मिळाला. त्यामुळे त्याच्यातील आक्रमक स्वभाव फिल्डिंग पोझिशनमध्येही दिसून आला.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम त्याच्या कर्णधारपदाच्या काळातही आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध होता. मॅक्युलमने एकदिवसीय सामन्यांमध्येही ४-४ स्लिप फिल्डर्सचा वापर प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यासाठी केला होता. आता मॅक्क्युलम कसोटी संघाचा प्रशिक्षक असल्याने त्याचा परिणाम इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणावरही दिसून आला. इंग्लंड संघ सध्या नवीन प्रशिक्षक आणि नवा कर्णधार (बेन स्टोक्स) यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे. त्याचीच प्रचिती या व्हायरल फोटोतून दिसून आली.

 

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडब्रेन्डन मॅक्युलमबेन स्टोक्सव्हायरल फोटोज्
Open in App