ENG vs PAK 2nd T20 : इंग्लंडने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून १-० ने आघाडी घेतली आहे. सध्या पाकिस्तानइंग्लंड दौऱ्यावर असून, तिथे चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना जिंकून यजमान इंग्लिश संघाने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या पाकिस्तानला घाम फुटला अन् २३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८३ धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक धावा करताना ५१ चेंडूत ८४ धावा कुटल्या. त्याने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले. त्याच्याशिवाय विल जॅक्सने ३७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर इमाद वसीम (२) आणि हारिस रौफ (२) यांना देखील बळी घेण्यात यश मिळाले.
इंग्लंडची १-० अशी आघाडी
इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला नेहमीप्रमाणे संथ खेळीचा फटका बसला. कर्णधार बाबर आझमने २६ चेंडूत ३२ धावा केल्या, मग फखर झमानने २१ चेंडूत ४५ धावा करून सामन्यात रंगत आणली. पण, इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. अखेर पाहुण्या संघाने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ १६० धावा केल्या आणि सामना २३ धावांनी गमावला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. रीस टॉप्लेने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोईन अली (२), जोफ्रा आर्चर (२), ख्रिस जॉर्डन (१), आदिल राशिद (१) आणि लियाम लिव्हिंगस्टोनला (१) बळी मिळाला.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सैम अयुब, फखर जमान, इरफान खान नियाझी, इफ्तिखार अहमद, उस्मान खान, आझम खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, सलमान अली आगा.
पाकिस्तानचा इंग्लंड दौरा
२२ मे - पहिला ट्वेंटी-२० सामना
२५ मे - दुसरा ट्वेंटी-२० सामना
२८ मे - तिसरा ट्वेंटी-२० सामना
३० मे - चौथा ट्वेंटी-२० सामना
Web Title: ENG vs PAK 2nd T20 England beat Pakistan by 23 runs in the second match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.