मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील विजेता संघ विश्वचषकाच्या किताबावर आपले नाव कोरेल. खरं तर आयसीसीला आज आणखी एक असा चॅम्पियन संघ मिळेल, ज्याने या स्पर्धेत दोनवेळा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी केवळ वेस्ट इंडिजच्या संघाने दोनवेळा हा किताब पटकावला आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामानातील बदलामुळे आम्ही पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्याचे इंग्लिश संघाचा कर्णधार जोस बटलरने म्हटले आहे.
खरं तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान या संघानी प्रवेश मिळवला होता. मात्र भारत आणि न्यूझीलंडच्या संघाला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर झाल्यावर पाकिस्तानचे माजी खेळाडू रोहित सेनेवर निशाणा साधत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू इम्रान नाझीरने फायनलच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला ट्विट करून भारताला डिवचले आहे. "ते तुम्हाला सांगणार नाहीत पण ते आजचा फायनलचा सामना पाहणार आहेत", अशा आशयाचे ट्विट करून नाझीरने भारतावर निशाणा साधला आहे.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -
जोस बटलर (कर्णधार), ॲलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद.
Web Title: ENG vs PAK Final Live Former Pakistan player Imran Nazir has targeted Indians from today's match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.