England won by 45 runs in 2nd T20I against Pakistan : इंग्लंडनं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानचे हवेत असलेले जमिनीवर आणले. पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विक्रमी विजय मिळवणाऱ्या पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात यजमानांकडून सडेतोड उत्तर मिळाले. चेन्नई सुपर किंग्सच्या मोईन अलीनं अष्टपैलू कामगिरी करताना इंग्लंडला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पण, या सामन्यात चर्चेत राहिला तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाज लाएम लिव्हिंगस्टोन यानं मारलेला उत्तुंग षटकार चर्चेचा विषय ठरला. पहिल्या सामन्यातही त्यानं शतक झळकावले होते आणि याही सामन्यात त्याच्या वादळी खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले.
इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या. कर्णधार जोस बटलर यानं ३९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या. मोईन अलीनं १६ चेंडूंत ३६ आणि लिव्हिंगस्टोननं २३ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावा केल्या. त्याच्या या तीन षटकारांपैकी एक षटकार एवढा खणखणीत होता की पाकिस्तानी गोलंदाज हॅरीस रौफ याला दिवसा तारे दिसले. १५व्या षटकात रौफच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोननं खणखणीत षटकार खेचला...